
देहूरोडमधील उपहारगृहाचे छत पावसामुळे पडले
देहूरोड, ता. १६ः देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावरील सेंट्रल चौकातील एका उपहारगृहाचे छत कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. शुक्रवारी (ता.१५) रात्री वेळेस हा प्रकार घडला. गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने हा प्रकार घडला.
देहूरोड पोलिस ठाण्यालगत असलेल्या सेंट्रल चौकात कॅंटोन्मेंटच्या मालकीचे काही गाळे आहेत. या ठिकाणी वीज वितरण कार्यालय आहे. तसेच तीन उपहारगृहे आहे. एका राजकीय पुढाऱ्याचे कार्यालय आहे. बोर्डाच्या मालकीची ही इमारत खूप जुनी आहे. शुक्रवारी रात्री पुणे ते मुंबईकडे जाणारी काही प्रवासी या उपहारगृहात जेवण करत होते. जेवण झाल्यावर बील देण्यासाठी ग्राहक उठले. तेवढ्यात सिमेंटचे छत कोसळले. छत टेबल खुर्च्यावर कोसळले. त्यामुळे जीवीत हानी झाली नाही.
या बाबत कॅंटोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधिक्षक राजन सावंत यांनी सांगितले, या इमारतीचे स्ट्रक्चरला आडीट झाले की नाही याची माहिती घेतो. सोमवारी(ता. १८) या बाबत माहिती देतो.
देहूरोड ः येथील सेंट्रल चौकातील एका उपहारगृहाचे छत शुक्रवारी रात्री कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
(डीयूएच16पी701113).
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28644 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..