
चाकूचा धाक दाखवून पिंपरीतून ऐवज लुटला
गुन्हे वृत्त
पिंपरी, ता. १७ : शिवीगाळ व चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वार तरुणाकडील ऐवज लुटल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला. राहुल टोणपे (वय २८, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सूरज बळी सोनकांबळे (रा. निराधारनगर,पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवरून काळेवाडी येथे जात होते. दरम्यान, मिलिंदनगर येथे आरोपीने फिर्यादीला अडविले. शिवीगाळ करीत चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील बारा हजारांचा मोबाईल व दोनशे रुपयांची रोकड काढून घेतली. त्यानंतर परिसरात दहशत निर्माण करून आरोपी निघून गेला. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
चऱ्होलीत एकाची सहा लाखांची फसवणूक
कंपनीच्या उत्पादनांची डिलरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची सहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार चऱ्होली येथे घडला.या प्रकरणी सागर दिलीप ढोरजे (रा. चऱ्होली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शशांक अगरवाल व संजीवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फोन करून आयटीसी लिमिटेड कंपनीच्या सर्व उत्पादनांची डिलरशिप मिळवून देतो असे सांगत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीस सिक्युरिटी अमाउन्ट म्हणून कोटक महिंद्रा शाखा पार्क स्ट्रीट कलकत्ता या बँकेचे खात्यात पाच लाख ९६ हजार ४०० रुपये भरण्यास सांगितले. तसेच आयटीसी लिमिटेड कंपनीची खोटी कागदपत्रे बनवून फिर्यादीस देऊन त्यांची फसवणूक केली. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पिंपरीत एकाला बेदम मारहाण
''युनियन छोड दो, कंपनी छोड दो '' असे म्हणत एकाला दांडक्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला. या प्रकरणी संजय बापू कदम (रा. जी ब्लॉक, एमआयडीसी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास कंपनीतून घरी जात होते. त्यावेळी पिंपरीतील लालटोपीनगर येथील सम्राट चौकातून दुचाकीवरून जात असताना दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. ''युनियन छोड दो, कंपनी छोड दो, असे म्हणत लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देत आरोपी दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
महिलेची ऑनलाइनद्वारे फसवणूक
वर्क फ्रॉम होम शोधणे एका महिलेला महागात पडले आहे. कामाचे आमिष दाखवून महिलेची एक लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केलेली. ही घटना चऱ्होली बुद्रुक येथे घडली. या प्रकरणी २६ वर्षीय महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला घरी बसून काम करता येईल असे वर्क फ्रॉम होम शोधत होत्या. ऑनलाइन माध्यमातून काम शोधत असताना आरोपीने त्यांना संपर्क केला. त्यांना एक लिंक पाठवून त्यावर पेमेंट खाते सुरु करण्यास सांगितले. वॉलेटवरील वस्तू खरेदी करायच्या व त्या वस्तू तिथेच ऑनलाइन विकायच्या. त्यातून नफा मिळेल, असे आरोपींनी फिर्यादी महिलेस सांगितले. महिला व त्यांच्या पतीच्या बँक खात्यातून एक लाख ६३ हजार रुपये पाठवण्यास सांगून आरोपींनी पैसे स्वीकारले. त्यानंतर महिलेची फसवणूक केली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28889 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..