विद्यार्थ्याची तेरा लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्याची तेरा लाखांची फसवणूक
विद्यार्थ्याची तेरा लाखांची फसवणूक

विद्यार्थ्याची तेरा लाखांची फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : कॅनडामधील विद्यापीठात प्रवेश मिळवून देतो असे सांगून तरुणाची तेरा लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मनदीप सिंग (रा. रुद्रपूर, उत्तराखंड), पंकज अग्रवाल (रा. यशोदानगर, कानपूर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी दीपक रामधीरज यादव (रा. खराळवाडी, पिंपरी, मूळ-नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला अलगोमा विद्यापीठात प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. फिर्यादीकडून १३ लाख २५ हजार रुपये घेतले. मात्र, नंतर विद्यापीठांत प्रवेश करून न देता ते पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28915 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..