दारूला पैसे मागितल्यावरून तरुणावर प्राणघातक हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारूला पैसे मागितल्यावरून
तरुणावर प्राणघातक हल्ला
दारूला पैसे मागितल्यावरून तरुणावर प्राणघातक हल्ला

दारूला पैसे मागितल्यावरून तरुणावर प्राणघातक हल्ला

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाच्या डोक्यात पाइप मारून प्राणघातक हल्ला केला. ही घटना चिंचवडमधील वेताळनगर येथे घडली. रोहित चव्हाण (वय २८, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. अरबाज इस्माईल शेख (वय २३, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) याला पोलिसांनी अटक केली आहे. चव्हाण यांच्या पत्नीने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चव्हाण हे आरोपीला दारू पिण्यासाठी पैसे मागत होते. या कारणावरून शेखने चव्हाण यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. डोक्यात पाइप मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28975 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top