रोकड चोरून एटीएम मशीन जाळणारे अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
रोकड चोरून एटीएम मशीन जाळणारे अटकेत

रोकड चोरून एटीएम मशीन जाळणारे अटकेत

महादे, योगेश वाळुंज, पोतदार व थोरात हे चौघे सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लि. या कंपनीतर्फे वेगवेगळ्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम (एटीएम ऑपरेटर) करतात. महादे व योगेश यांनी दोन दिवसापूर्वी या एटीएममध्ये पैसे भरल्यानंतर मशिनचे लॉक उघडेच ठेवले. तसेच रात्रीच्या वेळी रोकड लुटण्याचा कट रचला. त्यानुसार योगेशने कंपनीत काम करणारे सहकारी व गावाकडील मित्रांना बोलावून घेतले.

चोरीचा प्रयत्न

चौदा जुलैला रात्री मशीनमधून पैसे चोरल्यानंतर त्यावर डिझेल टाकून आग लावली. तसेच मशिन जळाल्याचा बनाव केला. या आरोपींकडून दोन लाखांची रोकड व गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त केली आहे. दरम्यान, या आरोपींनी एक वर्षांपूर्वी आळेफाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचीही कबुली दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29387 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimemoneyfirethiefATM