प्राधिकरण नागरी समितीच्या पर्यावरण अभ्यासकांना यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राधिकरण नागरी समितीच्या 
पर्यावरण अभ्यासकांना यश
प्राधिकरण नागरी समितीच्या पर्यावरण अभ्यासकांना यश

प्राधिकरण नागरी समितीच्या पर्यावरण अभ्यासकांना यश

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० ः पळसाच्या झाडाचे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण अभ्यासकांनी गोमूत्र व सेंद्रिय खताचा वापर करून किडीपासून संरक्षण केले होते. त्या पळसाच्या झाडाला नवीन संजीवनी प्राप्त झाली असून, यंदाच्या वर्षी लाल फुलांच्या पळसाने झाडावरच अनेक रोपांची व्यवस्था केली आहे. संत ज्ञानेश्वर उद्यानात अनेक वर्षानंतर बीज अंकुरलेल्या पळसाच्या शेंगांचे दर्शन घडत आहे.
अनेक वर्षानंतर असा दुर्मिळ योग प्राधिकरणाच्या संत ज्ञानेश्वर उद्यानात नागरिकांना अनुभवास येत आहे. या पळसाच्या संवर्धनासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे पर्यावरण अभ्यासक अर्चना घाळी, विजय मुनोत, संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, ॲड विद्या शिंदे, ओंकार पाटील, बाबासाहेब घाळी यांनी विशेष योगदान दिले. त्यामुळे आज शेकडो पळसाची बीजे झाडावरच अंकुरलेली दिसून येत आहेत.
अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, ‘‘प्राधिकरणातील सेक्टर २८ मधील संत ज्ञानेश्वर उद्यान-नक्षत्रवाटिका पिंपरी -चिंचवड हरित नगरीचा मानबिंदू आहे. चार वर्षांपूर्वी पळसाच्या झाडावर किडीमुळे संकट निर्माण झाले होते. वातावरणातील फरक व कस कमी झालेली माती यामुळे हे झाड मरणासन्न अवस्थेला पोचले होते. समितीच्या पर्यावरण सदस्यांनी या झाडाला सेंद्रिय खत व गोमूत्रच्या साह्याने पुनर्जीवन मिळवून दिले. लाल पळसाची फुले उन्हाळ्यात पक्षी व पोपटांना आकर्षून घेतात. त्यामुळे पोपट व पक्ष्यांची अन्नसाखळीसुद्धा भक्कम होते. झाडावरच अंकुरलेल्या बीजांचे दर्शन तसे दुर्मिळच. अंकुरलेल्या पळसाच्या बीजांचे रोपण सुरू आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29696 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..