Pimpri-Chinchwad एकाच दिवशी वाहनचोरीच्या दोन घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bike Thief
एकाच दिवशी वाहनचोरीच्या दोन घटना

Pimpri-Chinchwad : एकाच दिवशी वाहनचोरीच्या दोन घटना

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सांगवी व भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी वाहनचोरीच्या दोन घटना घडल्या. सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटनेत मोहमंद अकबर अली (रा. प्रभातनगर, किल-बिल शाळेजवळ, पिंपळे गुरव) यांची दुचाकी चोरीला गेली.

घराच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दहा हजार रुपये किमतीच्या दुचाकीचे लॉक तोडून लंपास केली, तर दुसरी घटना भोसरीतील गव्हाणे वस्ती येथे पुलाखाली घडली. याप्रकरणी अजित हनुमंत थोरवे (रा. शिरोली, ता. जुन्नर, पुणे) यांनी फिर्याद दिली.

पुलाखाली पार्क केलेली २५ हजार रुपये किमतीची दुचाकी भरदिवसा चोरली. या दोन्ही घटनेप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.