जिवे मारण्याची धमकी देत मागितली साठ लाखांची खंडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिवे मारण्याची धमकी देत 
मागितली साठ लाखांची खंडणी
जिवे मारण्याची धमकी देत मागितली साठ लाखांची खंडणी

जिवे मारण्याची धमकी देत मागितली साठ लाखांची खंडणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : जमिनीचा विकसन करारनामा करायचा असल्याचे सांगून, कोऱ्या कागदावर फोटो लावत स्वाक्षऱ्या अंगठे घेतले. त्याआधारे परस्पर जमीन नावावर करून फसवणूक केली. दमदाटी करीत न्यायालयातील दावा मागे घेण्यासाठी अपहरण करून जाळून टाकण्याची धमकी दिली. पिस्तुलाचा धाक दाखवत जातिवाचक शिवीगाळ व मारहाण करून साठ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार माण येथे घडला.

याप्रकरणी वसंत धोंडिबा साळुंखे (रा. माणगाव, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष अंकुश मोहिते, किशोर अंकुश मोहिते, अंकुश किसन मोहिते, एक चालक, दोन बॉडीगार्ड व गाडीतील अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी-२ कार्यालय व माणगाव येथे घडली. फिर्यादी व त्यांचा भाऊ अरुण यांना माणगाव येथील जमिनीचा विकसन करारनामा करायचा आहे, असे संतोष मोहिते, किशोर मोहिते यांनी सांगितले. जमिनीचे दुय्यम निबंधक कार्यालयात कुलमुखत्यार करून घेतले. 
त्याला जोडण्यासाठी कागदपत्रे लागत आहेत, असे सांगून कोऱ्या कागदावर दोघा साळुंखे भावांचे फोटो लावून, स्वाक्षऱ्या व अंगठे घेतले. त्याआधारे जमीन परस्पर स्वतःचे नावे करून त्याचा कोणताही मोबदला न देता साळुंखे यांची फसवणूक केली. 
दरम्यान, १० जुलैला गावातील एक अंतविधी करून साळुंखे हे रात्री घरी येत होते. त्यावेळी संतोष मोहिते व त्याच्या इतर साथीदारांनी त्यांना अडवले. दिवाणी न्यायालयात केलेला दावा मागे घेण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने गाडीत बसण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिला. त्यावेळी संतोष मोहिते याने फिर्यादी यांना जातिवाचक शिवीगाळ करून जाळून टाकण्याची धमकी दिली. तसेच मोहितेच्या बॉडीगार्डने फिर्यादी यांच्या डोक्याला पिस्तूल लावून गाडीत बसवून निर्जनस्थळी नेले. तेथे पुन्हा फिर्यादी यांना शिवीगाळ व मारहाण करून ‘तू केलेल्या केसमुळे मला लाखाचे नुकसान झाले असून त्या रकमेच्या व्याजासह तू मला साठ लाख रुपये दे’ अशी खंडणी मागितली. तसेच पैसे नाही दिले तर तुला ठार मारून टाकेन अशी धमकी दिली.
----------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j84314 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..