बुद्धं शरणं गच्छामि....बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुद्धं शरणं गच्छामि....बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
बुद्धं शरणं गच्छामि....बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

बुद्धं शरणं गच्छामि....बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

sakal_logo
By

बुद्धं शरणं गच्छामि....बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
पिंपरी, ता.१६ ः ‘‘वेळ आली आहे शांतीची, आला आहे प्रेमाचा सण, ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम भगवान बुद्धांस माझे नमन, आपणा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! अशा एकमेकांना शुभेच्छा देत तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. बौद्ध पौर्णिमेनिमित्त सकाळपासून बुद्धविहारात अनुयायांची गर्दी पाहायला मिळाली. त्यांनी सामुदायिक वंदना, ध्यानधारणा करण्यात आली. ‘बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, ’ ही त्रिशरण पंचशील गाथा बौद्ध अनुयायांनी म्हटली.
कोरोनाच्या सावटामुळे गेल्या दोन वर्षांत तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा साधेपणाने साजरी केली होती. मात्र यावर्षी बौद्ध अनुयायांच्यावतीने उपनगरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरात बौद्ध अनुयायांची मोठी संख्या आहे. शहरातील दापोडी, पिंपरीगाव, शाहूनगर, संत तुकाराम नगर, निगडी वसाहत, रावेत, मासुळकर कॉलनी, मोरवाडी, पिंपरी कॅम्प, आकुर्डी, काळेवाडी, रहाटणी, वाकड, थेरगाव आदी परिसरातील बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.
सकाळीच पांढरे वस्त्र परिधान करून बौद्ध बांधवांनी विहारात जाऊन बुद्धवंदना केली. विहारामध्ये बुद्धप्रतिमा सजविण्यात आली होती. त्यांनतर घरोघरी खीर बनविण्यात आली होती. गोडधोड्याच्या भोजनासाठी अनेकांनी मित्रमंडळी, आप्‍तेष्ठ्यांना घरी निमंत्रित केले होते. विविध समित्या, संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या वतीने प्रबोधनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, वादन, वक्तृत्व, चित्रकला, नृत्यस्पर्धा आदी कार्यक्रम घेण्यात आले. रावेत येथील महाकस्सप महाविहारात बौद्ध भिक्खूंनी भगवान गौतम बुध्दांना अभिवादन केले.

या दिवसांचे महत्त्व
बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषतः: भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले, असे भिक्खूंकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22k53898 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top