प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास येणाऱ्या खर्चास मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास येणाऱ्या खर्चास मान्यता
प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास येणाऱ्या खर्चास मान्यता

प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास येणाऱ्या खर्चास मान्यता

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ ः पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे नव्याने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास येणाऱ्या खर्चास महापालिका प्रशासक राजेश पाटील यांनी मंगळवारी (ता. ६) प्रशासकीय मान्यता दिली. तसेच सुमारे २५ कोटी ४७ लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना बैठकीत मंजुरी देण्यात आली.

बालेवाडी येथे होणाऱ्या ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेसाठी महापालिका सह आयोजकत्व घेणार आहे. या विषयासही मान्यता दिली. स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रशासकीय इमारतीमधील फायर फायटिंग यंत्रणेचे चालन देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ४७ लाख रुपये, उद्यान वृक्षसंवर्धन विभागासाठी इलेक्ट्रीक श्रेडर मशिन घेण्यासाठी ९ लाख ९२ हजार, नवीन थेरगाव, भोसरी, आकुर्डी आणि जिजामाता रूग्णालयाचे स्थायी अग्रिम प्रत्येकी ५० हजार रुपये, माध्यमिक विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांसाठी क्रमिक पुस्तके खरेदीसाठी १७ लाख ६४ हजार रुपये खर्चास, सुधारित विकास योजना महापालिका आणि पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयास संगणक संच आणि जीआयएस सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी ३० लाख ८२ हजार रुपये खर्चास यावेळी मान्यता दिली.
--
ही आहेत वैशिष्टे
ठाणे महापालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर प्रशासकीय प्रशिक्षण संस्था
१०० विद्यार्थ्यांना पूर्वपात्रता परीक्षा घेऊन प्रवेश
एसआयएसी परिक्षेत पास होणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना थेट प्रवेश
महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर परिक्षा घेऊन ५० जणांची निवड
या केंद्रासाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ, पुस्तके, नियतकालिके, नकाशे आणि साहित्य खरेदी
अनुभवी प्राध्यापक, व्याख्याते आणि परिक्षकांची तासिका पध्दतीने नियुक्ती

Web Title: Todays Latest Marathi News Pne22k83174 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top