‘स्वरनाद-संवादिनी शृंखला’चे प्रकाशन पुस्तकाचे चिंचवडमध्ये प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्वरनाद-संवादिनी शृंखला’चे प्रकाशन
पुस्तकाचे चिंचवडमध्ये प्रकाशन
‘स्वरनाद-संवादिनी शृंखला’चे प्रकाशन पुस्तकाचे चिंचवडमध्ये प्रकाशन

‘स्वरनाद-संवादिनी शृंखला’चे प्रकाशन पुस्तकाचे चिंचवडमध्ये प्रकाशन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० ः चिंचवड येथील हार्मोनिअम वादक राजीव तांबे यांच्या ‘स्वरनाद-संवादिनी शृंखला’ पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष डॉ. पं. विकास कशाळकर आणि भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे गांधर्व महाविद्यालयाचे पं. प्रमोद मराठे यांच्या हस्ते झाले. त्यातील काही गतींचे सादरीकरण तांबे यांनी केले. त्यांना तबल्याची उत्तम साथसंगत श्रीपाद गोडसे यांनी केली. सिटी प्राइड स्कूलचे संचालक अभय कुलकर्णी, परिणिता मराठे, संध्या काथवटे, लीलावती नरवणे, उमेश पुरोहित, विष्णू कुलकर्णी, संजीव तांबे आदी उपस्थिती होते. सचिन शिंगाडे यांनी संयोजन केले. अंकिता तांबे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22l88346 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..