
शांता शेळके यांना कवितांद्वारे अभिवादन
पिंपरी, ता. ८ ः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात कार्यक्रम झाला. त्यात शहरातील साहित्यिकांनी शेळके यांची एक कविता वाचून त्यांना मानवंदना दिली व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
मसापच्या चाळीसगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप, विदर्भ साहित्य संघ नागपूरचे शाखा समन्वय सचिव प्रदीप दाते, आटोक्लस्टर चिंचवडचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, मसाप पिंपरी-चिंचवड शाखा उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ आदी उपस्थित होते. शेळके यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नाटककार अभिराम भडकमकर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी शांताबाईंना वाहिलेली मानवंदना चित्रफितीद्वारे रसिकांना ऐकविण्यात आली. त्यानंतर उपस्थित साहित्यिकांनी शांता शेळके यांची एक कविता वाचून अभिवादन केले. डॉ. समिता टिल्लू, पुरुषोत्तम सदाफुले, श्रीकांत चौगुले, राज अहेरराव, विनोद अष्टूळ, नागेश गव्हाड, जयंत श्रीखंडे, ज्योती कानेटकर, विनिता श्रीखंडे, दीपक अमोलिक, किरण जोशी, रमाकांत श्रीखंडे, योगिता कोठेकर, विवेक म्हस्के यांनी सहभाग घेतला. वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक प्रदीप दाते यांनी संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले. माधुरी मंगरूळकर व जयश्री श्रीखंडे यांनी सूत्रसंचालन केले.
---
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m77641 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..