‘पाणी अडवा’मुळे आढलेचा कायापालट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पाणी अडवा’मुळे 
आढलेचा कायापालट
‘पाणी अडवा’मुळे आढलेचा कायापालट

‘पाणी अडवा’मुळे आढलेचा कायापालट

sakal_logo
By

सोमाटणे, ता. ९ ः ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ उपक्रमाचा उपयोग केल्याने जमिनीतील पाणी साठा वाढवण्यात आढले येथील माजी सरपंच नितीन घोटकुले यांचा प्रयोग यशस्वी झाला. उन्हाळ्यात पिण्यासाठी बोअरवेल व शासकीय पाणी योजना हाच पाण्याचा मुख्य स्त्रोत होता. त्यामुळे गावातील एकही शेतकरी उन्हाळी शेती करत नव्हता. यावर मात करण्यासाठी घोटकुले यांनी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या उपक्रमाचा उपयोग केला. यासाठी त्यांनी शेताचा उतार ज्या बाजूने आहे, त्या विचारात घेऊन ठराविक अंतरावर एकाखाली एक अशा पाच विहिरी खोदल्या. शेतीच्या उतारावर बांध घातले. पावसाळ्यात या पाचही विहिरी व बांध पूर्ण क्षमतेने भरले जात
होते. गेल्या सात वर्षात पावसाळ्यात सतत विहिरीत पाणी अडवले गेल्याने जमिनीतील पाणी साठा मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी शेवटच्या मोठ्या विहिरीला आज पाण्याचा गरजेप्रमाणे वापर करूनही मे महिन्याच्या अखेरीस विहिरीत पन्नास फूट खोलीचा पाणीसाठा शिल्लक आहे. याबाबत नितीन घोटकुले म्हणाले, ‘‘पाणी आडवा
पाणी जिरवा’ उपक्रमाचा वापर केल्याने जमिनीतील पाणीसाठा वाढला. त्यामुळे सध्या विहिरीत मुबलक पाणी साठा शिल्लक आहे. पाण्याची कमतरता असणाऱ्या मावळातील शेतकऱ्यांनी हा उपक्रम करावा, असे आवाहन त्यांनी केले.
फोटो ः ६९६८५

-----------------------------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m77652 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top