चिंचवड केशवनगर भागात अतिक्रमणांवर कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवड केशवनगर भागात
अतिक्रमणांवर कारवाईची मागणी
चिंचवड केशवनगर भागात अतिक्रमणांवर कारवाईची मागणी

चिंचवड केशवनगर भागात अतिक्रमणांवर कारवाईची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ : महापालिकेच्या वतीने सर्व प्रभागांत अतिक्रमण कारवाई सुरू असून चिंचवड केशवनगर भागातील चित्तराव गणपती मंदिर ते दर्शननगरी सोसायटी या भागातील अनधिकृत बांधकामांवर आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या बाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या असून, महापालिका अतिक्रमण विभागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या भागातही लवकरात लवकर कारवाई करून परिसराचा झालेला बकालपणा थांबविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
महापालिकेतर्फे व्यावसायिकांना केवळ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. परंतु, कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. हा भाग स्मार्ट सिटी अंतर्गत येत असून, महापालिकेतर्फे मोठे पदपथ तयार करून रस्ता लहान केला आहे. त्यामुळे नागरिकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या भागातील अनधिकृत व्यावसायिक कचरा तसेच राडारोडा पदपथ तसेच इतरत्र टाकून देत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा व वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m77983 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top