
नोव्हेल कॉलेजचा शंभर टक्के निकाल
पिंपरी ः नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या ज्युनिअर कॉलेजचा शंभर टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी अभिनंदन केले आहे. विज्ञान शाखेतून समीर वानखेडे, दर्शन सेठिया, ओंकार साखरे, वाणिज्य शाखेतील साक्षी सिंग, श्रेया उत्तेकर, मधुरा कोंढाळकर , कन्ननथारा रोहित यांनी प्रावीण्य मिळवले आहे. तर, विषयाप्रमाणे विज्ञान शाखेतून इंग्रजी विषयात आयशा शेख , रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र समीर वानखेडे याने विशेष कामगिरी केली. जैविकशास्त्र मयुरी घोरबंद , प्रांजल अजिवल, भूगोल धीरज चौधरी, माहिती तंत्रज्ञान देवकी पाटील यांनी यश संपादन केले. तर, वाणिज्य शाखेतील विषयांमध्ये इंग्रजीत कनिष्क राजपूत, अर्थशास्त्र साक्षी सिंग, मुस्कान शेख, साक्षी सिंग, सागर सुतार, मधुरा कोंढाळकर, श्रेया उत्तेकर, वरद पोतदार, रोहित कन्नथरा यांनीदेखील यश संपादन केले.
फुले महाविद्यालयाचा ९६ टक्के निकाल
पिंपरी ः महात्मा फुले महाविद्यालयातील बारावी विज्ञान वर्गाचा निकाल ९६ टक्के लागला असून, शुभांगी बलियारसिंग, प्रयांशु अहिर, संतोषी निंबाळकर यांनी चांगल्या गुणांसह यश संपादन केले. वाणिज्य वर्गाचा निकाल ९० टक्के लागला असून, चिन्मयप्रसाद कुलकर्णी, गायत्री भोसले, अशना पठाण गुणांसह उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल ६५ टक्के लागला असून, रितेश गाडे, हर्षदा शेडगे, भूषण सोनावणे गुणांसह उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल प्रभारी प्राचार्य माधव सरोदे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पिंपरी ः नेहरूनगरमधील श्री हनुमंतराव भोसले ज्युनियर कॉलेजचा ९७.६१ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेचा (९७.३६ टक्के), वाणिज्य शाखेचा (९७.६९ टक्के) निकाल लागला आहे. संस्थाध्यक्ष हनुमंतराव भोसले, प्राचार्य पवार यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78085 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..