खंडणीसाठी चिखलीतून ॉ़एकाचे अपहरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणीसाठी चिखलीतून
ॉ़एकाचे अपहरण
खंडणीसाठी चिखलीतून ॉ़एकाचे अपहरण

खंडणीसाठी चिखलीतून ॉ़एकाचे अपहरण

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ : खंडणीसाठी एकाचे अपहरण केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना नांदेड येथून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर अपहृताची सुखरूप सुटका केली.

बाळासाहेब निवृत्ती तनपुरे (वय ४७, रा. घरकुल, चिखली) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे तर दिलीप जाधव (वय ५४, रा. मु. पो. चेरा, ता. जयकोट , लातूर), अशोक रामचंद्र शेंडगे (वय ५२, रा. माजलगाव, बीड) अशी आरोपींची नावे आहेत. सहायक पोलिस निरीक्षक तौफिक सय्यद यांनी दिलेली माहिती अशी, तनपुरे यांचा गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. दरम्यान, आरोपींनी रविवारी (ता. ५) रात्री दहाच्या सुमारास चऱ्होली फाटा, डुडुळगाव येथे गाडीचे भाडे असल्याचे सांगून फिर्यादीला बोलावून घेतले. त्यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले. त्यानंतर फिर्यादी यांना मंगळवारी (ता.७) आरोपींनी फोन करून सुरवातीला २५ लाखांची मागणी केली. त्यानंतर जर तुम्ही तीन लाख रुपये दिले नाही तर तुमच्या पतीच्या जिवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली. याबाबत फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी नांदेड येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस नांदेडला रवाना झाले. तेथील कंधार येथे जाऊन तनपुरे यांची सुटका केली. तसेच दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
जाधव हा निवृत्त कर्नल असल्याचे सांगायचा तर शेंडगे हा त्याचा बॉडीगार्ड म्हणून काम करतो. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78238 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top