महापालिका निवडणूक ः आरक्षित जागांसाठी पक्षांच्या कोट्याकडे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका निवडणूक ः आरक्षित जागांसाठी पक्षांच्या कोट्याकडे लक्ष
महापालिका निवडणूक ः आरक्षित जागांसाठी पक्षांच्या कोट्याकडे लक्ष

महापालिका निवडणूक ः आरक्षित जागांसाठी पक्षांच्या कोट्याकडे लक्ष

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) राजकीय आरक्षण मिळेल की नाही, हे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. मात्र, पक्षांच्या कोट्यातून आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक ओबीसींची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यासाठी पक्षनेतृत्वाकडे उठ-बस वाढली आहे. २०१७ च्या ओबीसी आरक्षित जागांचा संदर्भ देऊन समिकरणे मांडली जात आहेत. दरम्यान, २७ टक्के आरक्षणानुसा ओबीसींना ३८ जागांचा कोटा द्यावा लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका, नगरपालिकांसह ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींना पूर्वीप्रमाणे २७ टक्के राजकीय आरक्षण मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी आवश्यक डाटा तयार करण्याचे काम सुरू असून तो न्यायालयात सादर केला जाणार आहे. तरीही आरक्षण न मिळाल्यास पक्षाच्या कोट्यातून ओबीसी समाजातील इच्छुकांना उमेदवारी दिली जाईल, असे सर्वच पक्षांतील नेत्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षित जागांचा संदर्भ घेत इच्छुकांनी आगामी ३८ जागांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

अशा असतील जागा
संवर्ग / महिला / एकूण
एससी / ११ / २२
एसटी / २ / ३
ओबीसी / १९ / ३८
खुल्या / ३८ / ७६
एकूण / ७० / १३९
---
२०१७ मधील ओबीसींची स्थिती
२०१७ ची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार झाली होती. त्यावेळी ३२ प्रभागांत १२८ जागा होत्या. २७ टक्के आरक्षणानुसार ३५ जागा ओबीसींना मिळाल्या होत्या. महिलांसाठीच्या ५० टक्के आरक्षणानुसार १८ जागा ओबीसी महिलांसाठी व १७ जागा ओबीसी खुल्या अर्थात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी होत्या. त्या जागांवर ओबीसी पुरुष व महिला दोघांनाही लढता येणार होते. त्यातील प्रभाग तीन चऱ्होली, प्रभाग १२ तळवडे, प्रभाग १८ चिंचवडगाव येथील प्रत्येकी दोन जागा ओबीसींसाठी आरक्षित होत्या. त्यातील प्रत्येकी एक जागा ओबीसी महिलेसाठी व एक जागा ओबीसी खुली अर्थात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित होती.

ओबीसी महिलांसाठी आरक्षित जागा
२०१७ मध्ये प्रभाग १ चिखली, २ जाधववाडी-बोऱ्हाडेवाडी, ३ मोशी-चऱ्होली, ४ दिघी-बोपखेल, ६ भोसरी-धावडेवस्ती, ८ इंद्रायणीनगर, ११ घरकूल, १२ तळवडे, १६ रावेत-किवळे, १८ चिंचवडगाव, १९ चिंचवड स्टेशन-आनंदनगर, २३ थेरगाव, २४ थेरगाव-पद्मजी मिल, २५ वाकड- ताथवडे- पुनावळे, २७ रहाटणी, ३० कासारवाडी-दापोडी, ३१ नवी सांगवी, ३२ जुनी सांगवी येथील प्रत्येकी एक जागा ओबीसी महिलांसाठी राखीव होती. तर, प्रभाग ३ मोशी-चऱ्होली, ५ भोसरी-सॅंडविक कॉलनी, ७ भोसरी गावठाण, ९ खराळवाडी, १० मोरवाडी-संभाजीनगर, १२ तळवडे, १३ निगडी गावठाण, १४ आकुर्डी-काळभोरनगर, १५ निगडी प्राधिकरण, १७ बिजलीनगर, १८ चिंचवडगाव, २० संत तुकारामनगर-कासारवाडी, २१ पिंपरीगाव, २२ काळेवाडी, २६ पिंपळे निलख, २८ पिंपळे सौदागर, २९ पिंपळे गुरव-सुदर्शनगर येथील प्रत्येक एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी खुला) आरक्षित होती. २०१७ च्या निवडणुकीनंतर महापौरपदाचे आरक्षण ओबीसींसाठी होते. त्या कोट्यातून चऱ्होलीतील नितीन काळजे व चिखली- जाधववाडी राहुल जाधव महापौर झाले होते. त्यानंतर सर्वसाधारण महिलांच्या कोट्यातून जुनी सांगवीतील उषा ढोरे महापौर झाल्या होत्या.

आगामी निवडणुकीची सद्यःस्थिती
२०२२ ची महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे. ४६ प्रभागांत १३९ जागा आहेत. त्यसाठी अंतिम प्रभाग रचना आणि अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत काढली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात एससीसाठी २२ व एसटीसाठी तीन जागा आरक्षित आहेत. पन्नास टक्के आरक्षणानुसार एससी महिलांसाठी ११, एसटी महिलांसाठी दोन आणि सर्वसाधारण महिलांसाठी ५७ अशा ७० जागांचे आरक्षण काढले आहे. ओबीसींना आरक्षण
मिळाल्यास किंवा पक्षांच्या कोट्यातून द्यायचे झाल्यास २७ टक्के आरक्षणानुसार ३८ जागा द्याव्या लागतील. त्यातील १९ जागा ओबीसी महिलांसाठी असतील.

ओबीसींसाठी संभाव्य आरक्षण
प्रभाग ४६ चार जागांचा असल्याने व त्याची अ जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव न झाल्याने ब गटातील जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित होईल. उर्वरित १८ जागांसाठी प्रभाग १ तळवडे, ३ बोऱ्हाडेवाडी, ४ मोशी, ५ चऱ्होली, ७ सॅंडविक कॉलनी, ८ गवळीनगर, ९ धावडेवस्ती, १० इंद्रायणीनगर, १२ घरकूल, १३ मोरेवस्ती, १५ संभाजीनगर, २१ आकुर्डी, २३ प्राधिकरण, २६ बिजलीनगर, २७ उद्योगनगर, २८ चिंचवड, ३० पिंपरीगाव, ३१ विजयनगर, ३३ रहाटणी, ३६ गणेशनगर, ४० पिंपळे सौदागर, ४२ कासारवाडी, ४५ नवी सांगवी या २३ प्रभागातील अ गटातून आरक्षण काढले जाईल. यातील उर्वरित पाच जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी खुल्या) आरक्षित होतील. या प्रवर्गाच्या उर्वरित १४ जागांसाठी प्रभाग १ ते ४०, ४२ व ४५ च्या ब गटातील ४२ जागांमधून आरक्षण काढले जाईल. राहिलेल्या २८ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होतील. त्यांच्या ५० टक्के आरक्षणानुसार ३८ जागा असतील. मात्र, प्रभाग ४६ चार जागांचा असल्याने व त्यातील एकच ब जागा महिलांसाठी राखीव झाल्याने क गटातील जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होईल. त्यामुळे आवश्यक असलेल्या ९ जागा १ ते ४५ प्रभागातील क गटातून आरक्षित होतील. क गटातील उर्वरित ३७ व प्रभाग ४६ मधील ड अशा ३८ जागा खुल्या राहतील.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78348 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top