चिंचवडमधील जलतरण तलाव सुरु करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडमधील जलतरण तलाव सुरु करा
चिंचवडमधील जलतरण तलाव सुरु करा

चिंचवडमधील जलतरण तलाव सुरु करा

sakal_logo
By

वाचकपत्र
जलतरण तलाव सुरू करावा

निगडीतील जलतरण तलावात दुर्घटना घडल्यामुळे गेल्या सात दिवसांपासून शहरातील इतर तलावही बंद केले आहेत. त्यामुळे, चिंचवडमधील वस्ताद बाळासाहेब गावडे जलतरण तलाव बंद ठेवला आहे. मात्र, या परिसरातील स्थानिक रहिवासी या ठिकाणी नियमित व्यायामासाठी येतात. तलावाची खोली कमी करून डागडुजीसाठी गेले दोन वर्षे कालावधी होता. परंतु, त्यावेळी लक्ष दिले नाही. क्रीडा व स्थापत्य विभागाला पत्र देवूनही अधिकाऱ्यांनी तरण तलावांच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच, गेल्या दहा दिवसांपासून तलाव पाण्याने भरण्यासाठी सुरु केले आहेत. त्यातही या तलावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग केला जात आहे. पाण्याचे बोअरवेल घेण्याचे काम अर्धवट सोडलेले आहे. अशा कामांसाठी ठेकेदारांवर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकायला हवे. तलावांचे खासगीकरण केल्याने गरीब जनतेला आर्थिक बोजा पडत आहे. इतर ठिकाणी जलतरण तलावांवर जाणे ज्येष्ठ नागरिकांना परवडत नाही.
- जितेंद्र निखळ, चिंचवड

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78511 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top