पुस्तकांसाठी ठराविक दुकानांचाच अट्टहास कमिशनचा व्यवसाय, ‘सीबीएसई’च्या शाळांमध्ये ‘एक पाठ्यक्रम, एक मूल्य’ची पालकांची मागणी शाळांची दुकानदारी -पालकांची लूटमारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुस्तकांसाठी ठराविक दुकानांचाच अट्टहास
कमिशनचा व्यवसाय, ‘सीबीएसई’च्या शाळांमध्ये ‘एक पाठ्यक्रम, एक मूल्य’ची पालकांची मागणी

शाळांची दुकानदारी -पालकांची लूटमारी
पुस्तकांसाठी ठराविक दुकानांचाच अट्टहास कमिशनचा व्यवसाय, ‘सीबीएसई’च्या शाळांमध्ये ‘एक पाठ्यक्रम, एक मूल्य’ची पालकांची मागणी शाळांची दुकानदारी -पालकांची लूटमारी

पुस्तकांसाठी ठराविक दुकानांचाच अट्टहास कमिशनचा व्यवसाय, ‘सीबीएसई’च्या शाळांमध्ये ‘एक पाठ्यक्रम, एक मूल्य’ची पालकांची मागणी शाळांची दुकानदारी -पालकांची लूटमारी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० ः मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांनुसार सीबीएसई शाळांचा देखील इयत्तानिहाय अभ्यासक्रम सारखाच असला पाहिजे. मात्र ‘अर्थकारणा’साठी सीबीएसई बोर्डाच्या प्रत्येक शाळांमध्ये वेगवेगळी पुस्तके पाहायला मिळत आहेत. परिणामी, कमिशनसाठी ठराविक दुकानदारांकडून पुस्तक घेण्याचा अट्टहास केला जात आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत ‘एक पाठ्यक्रम, एक मूल्य’ असावे, अशी मागणी पालकांकडून होत आहेत.
सध्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांना विविध बोर्डाचे पर्याय उपलब्ध आहेत. राज्य शिक्षण मंडळ, सीबीएससी बोर्ड, आयसीएसइ बोर्ड, केंब्रिज बोर्ड, आयबी बोर्ड, असे विविध बोर्ड उपलब्ध आहेत. पण ८० टक्के अभ्यासक्रम हा सर्वांचा सारखाच आहे. भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याने वयानुसार मुलांना काय शिकवायचे, वयानुसार कुठले स्कील अपेक्षित आहे, याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. हे पाठ्यपुस्तक राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) किंवा राज्यात स्टेट काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च एंड ट्रेनिंग एससीईआरटी यांच्या मान्यतेनुसार असतात. पण काही वर्षात सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी स्वतःची मक्तेदारी सुरू केली आहे. शाळांचा गोरखधंदा सुरू राहण्यासाठी बोर्ड एकच, पण आजच्या घडीला तपासणीअंती प्रत्येक शाळांची पुस्‍तके वेगवेगळी असल्याची आढळून येत आहे. शहरात १०० च्या वर सीबीएसई बोर्डाच्या शाळा आहेत. सीबीएसईच्या शाळांमध्ये एकच अभ्यासक्रम असला पाहिजे. त्यामुळे दरवर्षी पालकांना नव्या पुस्तकांचा आर्थिकभार सहन करावा लागत आहे. अगदी पहिलीच्या मुलांची पुस्तके वेगवेगळी पाहायला मिळत आहेत. यापूर्वी अनेकजण जुन्या पुस्तकांचा वापर करून शिकलेली दिसत आहे. मग आताच का नवीन पुस्तक खरेदीचा अट्टहास का? असा प्रश्‍न पालकांना पडला आहे. शिक्षण संस्थांनी शिक्षण देण्याऐवजी गोरखधंदा मांडल्याची प्रतिक्रिया निगडीतील पालक सुरेश खिल्लारे यांनी मांडली.

बोर्डाची गरज कधी?
आठवीपासून पुढच्या शिक्षणासाठी बोर्डाची गरज भासते. कुठलाही बोर्ड फक्त दहावी आणि बारावीची परीक्षा घेते. बोर्डाचे काम फक्त परीक्षा आयोजित करणे असते. कुठलेही बोर्ड पाल्याला हुशार करीत नाही. शाळा त्या विद्यार्थ्यावर काय मेहनत घेते. त्यावर त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अवलंबून असते. प्री - प्रायमरीचा अभ्यासक्रम काय असावा? याचा कुठलेही पाठ्यपुस्तक सरकार कडून, कुठल्याही बोर्डाकडून निश्चित केलेला नाही. भारतात शिक्षण कायदा हा सहा वर्षाच्या वयापासूनच सुरु होतो. त्यामुळे प्री प्रायमरीला कुठल्याही बोर्डाचा अभ्यासक्रम नाही, तरी पालक त्यासाठी लाखाच्या घरात पैसे मोजत आहेत.


विद्यार्थ्यांना शिकवले जाते का?
सर्व बोर्ड हे चांगले आहेत. सीबीएससी बोर्डाने ज्ञानरचनावादी शिक्षणाची सुरवात केली असली तरी शाळा किंवा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिकवले जाते का? प्रश्‍न उपस्थित होतो. प्रायव्हेट पब्लिशर यांना पुस्तक पानांची संख्या किती असावी यावर मर्यादा नसते. त्यामुळे ते कुठलीही संकल्पना विविध पद्धतीने आणि आवश्यक नसलेली अधिकची माहिती छापतात. यातील बराच भाग बोर्डाच्या परीक्षेत येणार सुद्धा नसतो. पण जास्तीची माहिती छापून अधिक पानांचे पुस्तक बनवून पुस्तकांची किंमत पालकांकडून वसुल केली जाते.


बऱ्याच शाळेत योग्य समाधानकारक अर्हताप्राप्त शिक्षक भरती न करता बी.ए. बीएस्सीचे शिक्षण झालेले अप्रशिक्षित शिक्षक वर्गात उभे केले जात आहेत. सर्वसामान्य मुलांना पुढे शिकणं अवघड होणार आहे. शिक्षण अधिकारी गप्प बसून आहेत.
-प्रशांत रोकडे, पालक चिंचवड

आयबी बोर्ड असो की सीबीएससी काही फरक पडत नाही. तुम्हाला
बाहेर शिकवणी लावावीच लागते. तरीही चांगला शिक्षक भेटेल की नाही, याची काही शाश्वती सांगता येत नाही. नव्या पुस्तकांमुळे पालकांना खूप भुर्दंड सहन करावा लागत आहे.
-संध्या पाटील, पालक, पिंपळे गुरव

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78530 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top