बोपखेल शाळेचा आयुक्तांकडून सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोपखेल शाळेचा
आयुक्तांकडून सत्कार
बोपखेल शाळेचा आयुक्तांकडून सत्कार

बोपखेल शाळेचा आयुक्तांकडून सत्कार

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ ः आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल बोपखेल येथील महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकांचा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त संदीप खोत, चंद्रकांत इंदलकर, रविकिरण घोडके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, यांच्यासह आकांक्षा फॉंडेशनचे सुषमा पठारे, डॉनी बिजू, निखील एकबोटे, बोपखेल येथील शाळेचे शिक्षक आणि आकांक्षा फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या बोपखेल येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे नाव जगातील सर्वोत्तम शाळांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या नामांकन यादीत ‘समुदाय सहयोग’ या श्रेणीअंतर्गत पहिल्या दहामध्ये आहे. असा पुरस्कार मिळवणारी राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहिली शाळा ठरली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आणि आकांक्षा फाऊंडेशन यांच्यावतीने या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण दिले जाते. या पुरस्काराबद्दल आयुक्त पाटील यांनी शाळेचे तसेच आकांक्षा फाऊंडेशनचे कौतुक केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78844 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top