
पंतप्रधानांच्या देहू दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात
पिंपरी, ता. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सुरक्षेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. शनिवारी बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून परिसराची तपासणी करण्यात आली. केंद्रीय पथकही दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान १४ जूनला देहूत येत आहेत. लोकार्पण सोहळ्यानंतर माळवाडी येथील लष्कराच्या २२ एकर मैदानावर संवाद सभा होणार आहे. यासाठी तीन मंडप उभारण्याचे काम सुरु आहे. लगतच्या मैदानावरच तीन हेलिपॅड केले आहेत. दरम्यान, चाकण -तळेगाव रस्त्याने तसेच देहू-आळंदी रस्त्याने येणाऱ्या भाविकांसाठी नवीन बायपास रोडने सभास्थळापर्यंत येण्याची व्यवस्था केली आहे. या मार्गाने येणाऱ्या भाविकांना विठ्ठलवाडी येथून नवीन बायपास रस्त्याने जुन्या पालखी मार्गाने सभास्थळी जाता येईल. तसेच गावातून जाणारे भाविकही जुन्या पालखी मार्गाने जातील. देहूरोड मार्गे येणारे भाविक झेंडेमळा येथील रस्त्याने येतील. या मार्गांवर सभा स्थळापासून दीड किलोमीटरवर ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था केली आहे. जुन्या पालखी मार्गावरून सभास्थळी जाण्यासाठी प्रवेश असेल.
मुख्य मंदिर-मुख्य कमान, परंडवाल चौक-माळवाडी हा रस्ता पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच साईराज चौक-सांगुर्डी फाटा-परंडवाल चौक व भैरवनाथ चौक ते मुख्य मंदिर हे रस्तेही बंद राहतील. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक उभारण्याचे काम सुरु आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78948 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..