उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम पुढे जाईल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा विश्‍वास, ‘एमइसीएफ’चे उद् घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम पुढे जाईल 
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा विश्‍वास, ‘एमइसीएफ’चे उद् घाटन
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम पुढे जाईल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा विश्‍वास, ‘एमइसीएफ’चे उद् घाटन

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम पुढे जाईल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा विश्‍वास, ‘एमइसीएफ’चे उद् घाटन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राला कोणी थांबवू शकत नाही, तो कायम पुढेच जाईल. या भूमीत नवीन संधी आहेत. सर्व प्रकारची आव्हाने स्वीकारायला व पुढे जाण्यासाठी आपण त्यासाठी तयार राहू. पुणे-भोसरीतील इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाऊंडेशनसारख्या क्लस्टर्सना केंद्र व राज्य सरकारसह सर्वजण मिळून पुढे नेऊ, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी (ता. ११) भोसरी येथे केले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाउंडेशनचे (एमइसीएफ) उद्घाटन देसाई यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पास केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर यांचे सहकार्य लाभले आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, एमसीसीआयएचे अध्यक्ष सुधीर मेहता, सरसंचालक प्रशांत गीरबने, एमइसीएफचे अध्यक्ष प्रदीप भार्गव उपस्थित होते.
देसाई म्हणाले की, ‘‘एमइसीएफच्या या क्लस्टरमध्ये सर्टिफिकेशन, टेस्टिंग, लॅबोरेटरी, डिझाईन अशा इलेक्ट्रॉनिकमधील सेवा समाईकपणे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिकमधील सेवा, उत्पादने जागतिक दर्जाची होतील. उद्योगांना या सुविधांचा फायदा होईल. पुणे परिसरात हे केंद्र सुरु होत आहे, याचा महाराष्ट्राला अभिमान आहे.’’
प्रदीप भार्गव म्हणाले, ‘‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टरच्या प्रकल्पासाठी ६७ कोटी रुपये खर्च झाला आहे. यामध्ये केंद्र सरकारने १५ कोटी, राज्य सरकारने ६ कोटी ७० लाख, एमसीसीआयएने १० कोटी ३० लाख असे सर्वांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प उभा राहिला आहे.’’
राजेश पाटील म्हणाले, ‘‘औद्योगिक भागात नागरी सुविधा देण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी महापालिकेने यावर्षी अंदाजपत्रकात तरतूद केलेली आहे.’’
सुधीर मेहता यांनी स्वागत केले. प्रदीप गीरबने यांनी आभार मानले.

कोट
जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातून राज्यात ६ लाख कोटींची गुंतवणूक आणली. त्यात अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, कोरिया, सिंगापूर आदी देशांतील उद्योगांचा समावेश आहे. नुकतीच दुबई, दावोसमधून आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत व आम्ही ८० हजार कोटींची गुंतवणूक आणली. या गुंतवणूक करणाऱ्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांना पुणे परिसरातून भागीदार कंपन्या मिळतील, याचा मला विश्‍वास आहे.
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री
फोटो ः 70446

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78954 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top