वाचक लिहितात... ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण त्रास का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचक लिहितात...
ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण त्रास का?
वाचक लिहितात... ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण त्रास का?

वाचक लिहितात... ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण त्रास का?

sakal_logo
By

अर्ध्या तिकिटात एसटीचा प्रवास होतो म्हणून पासष्टी पूर्ण झालेली माणसे आनंदाने डेपोत जातात. कागदपत्रांची पूर्तता करतात. परंतु, स्मार्टकार्ड असेल तरच एसटीचे अर्धे तिकीट मिळेल, असे एसटी महामंडळाने सांगितले आहे. त्यासाठी मुदत दिली आहे. वास्तविक, असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करूनही अद्याप स्मार्टकार्ड आलेले नाहीत. मध्यंतरी कोरोना काळ होता. त्यामुळे, एसटी महामंडळाचे काम ठप्प होते. त्यानंतर, कर्मचाऱ्यांचा संप झाला. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज केले होते. त्याची पूर्तता महामंडळाने केली नाही. आता फतवा काढला आहे की, स्मार्टकार्ड असेल तरच प्रवास करता येईल. मी संत तुकारामनगर एसटी डेपोत गेलो. त्यांनी सांगितले, येथील मशिन खराब झाली आहे. १५ दिवसांनी या. तूर्तास, स्मार्टकार्डसाठी ज्या ज्येष्ठ नागरिकांनी यापूर्वी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना अर्जाची प्रत आणि आधारकार्ड दाखवल्यास अर्धतिकिट प्रवास मिळालाच पाहिजे. याकरिता एसटी डेपोत ज्येष्ठ गर्दी करीत आहेत. या ज्येष्ठ माणसांचे दुःख एसटी महामंडळाने समजून घ्यावे. ज्येष्ठ नागरिकांना आंदोलन करायला लावू नये. सर्वस्वी एसटी महामंडळाची चूक असताना त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना होत आहे.
- सुरेश कंक, चिंचवड

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79060 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top