Thur, July 7, 2022

वाचकपत्र
पीएमपीएलची सेवा
असमाधानकारक
वाचकपत्र पीएमपीएलची सेवा असमाधानकारक
Published on : 12 June 2022, 12:15 pm
पीएमपीएलची पुणे व संलग्न ग्रामीण भागातील सेवा असमाधानकारक आहे. बस थांबे नसणे, असलेल्या थांब्यावर असुविधा, बसगाड्या मध्येच बंद पडणे अशा समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. त्यात बसमध्ये चोरांचा धुमाकूळ वाढला आहे. महिलांच्या गळ्यातील व हातातील सोने दिवसाढवळ्या लुटले जात आहे. यातील बहुतांशी चोर या महिला आहेत. ठरावीक मार्गावर या बसमध्ये चढतात आणि उतरतात. हा त्यांचा दैनंदिन व्यवसाय झाला आहे. याला पीएमपी प्रशासनाने अटकाव घालणे गरजेचे आहे. कित्येकदा बस वाहकांना हे चोर माहीत असूनही कारवाई केली जात नाही. बसगाड्यांमध्ये साध्या वेशातील पोलिस ठेवावेत. हायफाय सेवा देण्यापेक्षा प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे.
- अरविंद करंदीकर, तळेगाव दाभाडे
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79111 Txt Pc Today
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..