पिंपरी : ओबीसी संकलन अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC
ओबीसी डाटा संकलन अंतिम टप्प्यात

पिंपरी : ओबीसी संकलन अंतिम टप्प्यात

पिंपरी - स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी डाटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांनिहाय डाटा संकलित करण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. त्यासाठी आठ अधिकारी आणि ४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

ग्रामपंतायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपंचायती, नगरपरिषदा, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे संपुष्टात आले आहे. ते पुन्हा मिळवण्यासाठी ओबीसींचा डाटा न्यायालयात सादर करायचा आहे. अशा डाटामुळे मध्यप्रदेशातील ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले आहे, तसेच आरक्षण महाराष्ट्रातही मिळेल, अशी आशा सर्व राजकीय पक्षांना व ओबीसी नेत्यांना आहे. त्यासाठी ओबीसींचा डाटा संकलित केला जात आहे.

त्याबाबत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचे पत्र महापालिकेला आहे. शिवाय, त्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्तांनीही महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना दिल्या आहेत. त्यानुसार, डाटा संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघानिहाय मतदारयाद्या ग्राह्य धरल्याअसून त्यानुसार टाडा संकलित केला जात आहे.

त्यासाठी कर्मचाऱ्यांना मंगळवार, सात जून रोजी प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्याकडून सर्व डाटा संघनकावर संकलित करून सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

सर्व्हर डाउनमुळे विलंब

ओबीसींच्या आरक्षणाबाबत डाटा संकलित केला जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्व्हर डाउन झाल्यामुळे दोन दिवस अडथळे आले होते. आता डाटा संकलनाचे काम सुरळीत सुरू असून लवकरच तो नगरविकास विभागाकडे पाठविला जाईल, असे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.

या अधिकाऱ्यांवर जबाबदारी

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्यांच्या भागांच्या आधारे क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर डाटा संकलनाची जबाबदारी आहे. यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी क्षेत्रीय अधिकारी विनोद जळक, उमाकांत गायकवाड, विजयकुमार थोरात; पिंपरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी क्षेत्रीय अधिकारी शीतल काकडे, अभिजित हराळे; भोसरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, राजेश आगळे व सीताराम बहुरे यांच्यावर आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

धर्मानुसार माहिती

दर दहा वर्षांनी होणारी जनगणना २०२१ मध्ये झाली नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या गृहित धरून होत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीही २०११ चीच लोकसंख्या गृहित धरली आहे. त्यानुसार हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, बुद्धिस्ट, जैन, इतर धर्म व अस्थायी अशा प्रमाणात लोकसंख्येचे वर्गीकरण केले होते.

इतके जण राबताहेत

मतदारसंघ अधिकारी कर्मचारी

पिंपरी २ १०

चिंचवड ३ १८

भोसरी ३ १७

एकूण ८ ४५

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79376 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top