वृक्षारोपण, कार्यशाळा अन् पालक मेळावा ः | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्षारोपण, कार्यशाळा अन् पालक मेळावा
ः
वृक्षारोपण, कार्यशाळा अन् पालक मेळावा ः

वृक्षारोपण, कार्यशाळा अन् पालक मेळावा ः

sakal_logo
By

पिंपरी ः श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, चिंचवड संचालित श्री गुरुमैय्या प्रभाकंवरजी प्राथमिक विद्यामंदिरात सुफलाम् फर्म्सच्यामदतीने वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी संस्थेचे ऑनररी जनरल सचिव अ‍ॅड. राजेंद्रकुमार मुथा, शीतल शिंदे उपस्थित होते. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक जयप्रकाश दहिफळे, सचिन परब, पांडुरंग तेली, मोहन पालवे यांनी परिश्रम घेतले.

कुलकर्णी, महाजन यांची निवड
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने १८ ते २० जून २०२२ या कालावधीत राष्ट्रीय योगा ऑलिम्पियाड स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक राज्यातून उत्कृष्ट असे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रत्येकी चार मुले व चार मुली यांची निवड करण्यात आली आहे. यात विद्यानंद भवन हायस्कूल निगडीची योगापटू सिद्धी कुलकर्णी व कुशल महाजन यांची निवड झाली आहे. या दोघांनी यापूर्वी ही कमी वयात राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केली आहे. या दोघांना भारतीय योगा टीमचे कोच योगगुरू चंद्रकांत पांगारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या दोघांची निवड होताच मुख्याध्यापिका छाया हब्बू, पर्यवेक्षिका मनीषा सुर्वे, क्रीडाशिक्षक साहेबराव जाधव, शीतल म्हात्रे यांनी दोघांचे अभिनंदन केले.

रॅडक्लिफ स्कूलतर्फे वृक्षारोपण
चऱ्होली येथील रॅडक्लिफ ग्रुप ऑफ स्कूलच्या वतीने नक्षत्र आयलँड मोशी येथील सोसायटीमध्ये भारतीय रोपे लावण्यात आली. यात रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन वृक्ष लागवड केली. त्याचबरोबर पर्यावरणाला प्लॅस्टिकच्या वापराचा धोका कसा आहे याबद्दल शाळेचे विज्ञान शिक्षक निखिल जोशी आणि मीनाक्षी पाटील यांनी येथील नागरिकांना मार्गदर्शन केले. यानिमित्ताने कापडी पिशवी वाटपही करण्यात आले. पर्यावरण दिनाचे महत्त्व सर्व नागरिकांना पटवून दिले. सोसायटीचे अध्यक्ष नीलेश बहिरट, रमेश नवले, अनिल भोईटे सहभाग घेतला. कार्यक्रमास रॅडक्लिफ स्कूलच्या मुख्याध्यापिका रूपाली कर्डिले आणि विभागीय व्यवस्थापक रवी पवार यांनी मार्गदर्शन केले. शुभम चिमणे, केतन चिद्रेवार, पियाली मुखर्जी यांचे सहकार्य लाभले.

ज्ञानदीप विद्यालयात कार्यशाळा
रुपीनगर येथील ज्ञानदीप विद्यालय येथे शिक्षक कार्यशाळा घेण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी प्रकाश परब यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. या वेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी सचिव शहाजीराव ढेकणे ,माजी शिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण ,संस्थेचे कार्याध्यक्ष भागवत चौधरी, सचिव शांताराम दगडू भालेकर , दशरथ जगताप, सोपानराव फडके सूर्यकांत भसे, संपत भालेकर सुभाष चौधरी , रमेश भालेकर, प्राचार्य सुबोध गलां१डे, राजा शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक गोवर्धन चौधरी आदी उपस्थित होते. परब म्हणाले, ‘‘नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्यावर आधारित शिक्षण देणे, रोजगाराभिमुख शिक्षण देणे, विद्यार्थ्याला दैनंदिन जीवनातले प्रश्‍न सोडविण्यास सक्षम बनवा. समाज, विद्यार्थी , पालक , शासन जागतिक पातळीवरील माणसांच्या भेडसावणारा समस्या सोडविणारे शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. ’’ सहसचिव सूर्यकांत असे यांनी आभार मानले.

शाळापूर्व पालक मेळावा
भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री-प्रायमरी १०शाळेत शाळापूर्व पालक मेळावा उत्साहात पार पडला. ज्ञानप्रबोधिनी निगडी प्री-प्रायमरी विभागाच्या प्राचार्य वैशालीताई तळेगावकर , दिगंबर ढोकले, संदीप बेडुंरे, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी मुकुंदराव आवटे, शिवराम काळे, रोहिदास गैंद, मनोज पवार, शोभा आरुडे, रोहिणी पवार, उज्वला थिटे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वटवृक्षाच्या पूजनाने पालकांच्या हस्ते करण्यात आली. उपस्थित पालकांचे स्वागत शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. ‘‘राष्ट्र घडवण्यासाठी मुले घडविणे महत्त्वाचे असते. व हे काम पालक आणि शाळा यांनी करावयाचे असते. मुलांसाठी संस्कारक्षम कृतिशील, विद्यार्थी केंद्रे आणि आनंदाची शिक्षणाची गरज आहे,’’ असे मत तळेगावकर यांनी व्यक्त केले. पालक सहादु बागूल, मिनीनाथ सस्ते, विवेक जगताप, शिवराम काळे यांनी मनोगत व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी केले. आभार
अंकुशराव गोरडे यांनी मानले. संयोजन प्राचार्य, विजय चौगुले , प्रतिभा तांबे, मीनल बागूल, सायली संत, भाग्यश्री नगरकर, सुरेखा मुके, प्रवीण भाकड यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79463 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top