द्रुतगती मार्गावर दुचाकी आणू नका महामार्ग पोलिसांकडून इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्रुतगती मार्गावर 
दुचाकी आणू नका 
महामार्ग पोलिसांकडून इशारा
द्रुतगती मार्गावर दुचाकी आणू नका महामार्ग पोलिसांकडून इशारा

द्रुतगती मार्गावर दुचाकी आणू नका महामार्ग पोलिसांकडून इशारा

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १४ ः द्रुतगती मार्गावर दुचाकी चालवू नये, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले असून, नियम मोडल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
द्रुतगती मार्गावर मोटरसायकल, रिक्षा, ट्रॅक्टर या वाहनास प्रतिबंद आहे. मात्र, रस्त्यालगतच्या गावातील अनेक नागरिक रस्ते विकास महामंडळाने सेवा रस्त्याचे काम न केल्याचे सांगून सर्रास द्रुतगती मार्गावर मोटारसायकलचा प्रवासासाठी वापर करतात. यातूनच गेल्या दोन दशकात अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही द्रुतगती मार्गावरचा मोटरसायकलस्वारांचा प्रवास थांबलेला नाही.
दररोज सकाळ व संध्याकाळ द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या जास्त असताना मोटारसायकलस्वार प्रवास करतात. हा प्रवास अत्यंत धोकादायक असल्याने महामार्ग पोलिसांच्यावतीने दुचाकीस्वारांना द्रुतगती मार्गावर वाहन न आणण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार थांबण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून दंडात्मक कारवाई वाढवण्यात आली आहे.
फोटो ः ७०९२२
-----------------------------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79642 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top