हरकती व सूचनांबाबत २० ते २७ जून सुनावणी ‘पीएमआरडीए’कडून प्रारूप विकास योजना प्रसिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरकती व सूचनांबाबत
२० ते २७ जून सुनावणी
‘पीएमआरडीए’कडून प्रारूप विकास योजना प्रसिद्ध
हरकती व सूचनांबाबत २० ते २७ जून सुनावणी ‘पीएमआरडीए’कडून प्रारूप विकास योजना प्रसिद्ध

हरकती व सूचनांबाबत २० ते २७ जून सुनावणी ‘पीएमआरडीए’कडून प्रारूप विकास योजना प्रसिद्ध

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : पुणे महानगर प्रदेशाची प्रारुप विकास योजना २ ऑगस्ट २०२१ रोजीच्या सूचनेअन्वये प्रसिद्ध झाली असून, प्राप्त हरकती/सूचना याबाबत नियोजन समिती नियुक्त झालेली आहे. याबाबत २० जून ते २७ जून २०२२ या कालावधीत, सकाळी १० ते १.३० व दुपारी २.३० ते ५ दरम्यान सुनावणीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

तळेगांवमधील आंबी, वराळे, बधलवाडी, जांभूळ, सांगवी, नाणोली तर्फे चाकण, मेंढेवाडी, आंबळे, जाधववाडी, कल्हाट, निगडे, पवळेवाडीच्या सुनावणी २० जून पीएमआरडीए कार्यालय, पहिला मजला, नविन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशन या ठिकाणी होत आहे. तसेच, खडकाळे, साते, नवलाख उंब्रे, कान्हे, नायगांव, कुसगांव खु., अहिरवडे, मोहितेवाडी, चिखलसे, पारवाडी, ब्राम्हणवाडी (साते) या सुनावण्या २२ तारखेला तसेच, कामशेत, ओझर्डे, करूंज, आढे खु. सदवली, ब्राम्हणवाडी, बऊर या भागातील सुनावणी २२ जूनला व तळेगाव दाभाडे, उर्से, सोमाटणे, माळवाडी, परंदवाडी, नाणोली एन. एम. या सुनावण्या २७ जून रोजी होणार आहेत.

प्रारुप विकास योजनेवर विहीत वेळेत सूचना-हरकत सादर केलेल्या अर्जदारास, सुनावणीबाबतचा सविस्तर तपशील रजिस्टर्ड पोस्टाद्वारे व एसएमएसद्वारे कळविण्यात आलेला आहे. याचा सविस्तर तपशिल हा प्राधिकरणाच्या www.pmrda.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79769 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top