राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झोपडपट्टी सेलतर्फे भाजपचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झोपडपट्टी सेलतर्फे भाजपचा निषेध
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झोपडपट्टी सेलतर्फे भाजपचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झोपडपट्टी सेलतर्फे भाजपचा निषेध

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ : देहू येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही, या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झोपडपट्टी सेलचे शहराध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर निषेध केला आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १४) झाला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारही उपस्थित होते. ‘आपण केलेली विकासकामे जनतेसमोर सांगून भाजपला उघडे करणार,’ या भीतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस घाबरून गेले होते. त्यामुळेच अजित पवार यांना बोलू दिले नाही. हा सबंध महाराष्ट्राचा अवमान आहे. आगामी काळात भाजपला पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यांमधून हद्दपार करूनच, या घटनेचा वचपा काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे झोपडपट्टी सेलचे शहर अध्यक्ष निसर्गंध यांनी पत्रकात म्हटले आहे.
---------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80416 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top