मध्य रेल्वे सल्लागार समितीवर अप्पासाहेब शिंदे यांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वे सल्लागार समितीवर
अप्पासाहेब शिंदे यांची नियुक्ती
मध्य रेल्वे सल्लागार समितीवर अप्पासाहेब शिंदे यांची नियुक्ती

मध्य रेल्वे सल्लागार समितीवर अप्पासाहेब शिंदे यांची नियुक्ती

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस ॲंड ॲग्रिकल्चरचे ॲड. आप्पासाहेब शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.

पुणे रेल्वे विभागीय समितीची बैठक १० जून रोजी झाली. रेल्वे समितीत पिंपरी-चिंचवड, सातारा, सांगली-मिरज, कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. ही बैठक मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापिका रेणू शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पत्रकार परिषदेला उद्योजक ॲड. अप्पासाहेब शिंदे, बशीर सुतार, रामदास माने, प्रेमचंद मित्तल उपस्थित होते.
शेतमाल वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर जास्तीत जास्त व्हावा, त्याचप्रमाणे, प्रवाशांसाठी विशेष सवलती, सुलभ तिकीट नियोजन, देवदर्शन सामूहिक सहलींच्या माध्यमातून प्रवासी वाढावेत. तसेच, तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन या ठिकाणी मालधक्का उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर, रेल्वे समितीतील सर्व सदस्यांसाठी वार्षिक पास ५०० किलोमीटरपर्यंत तिकिटांत ५० टक्के सवलत देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. शिंदे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80528 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top