महापालिका शाळांचा निकाल घटला दहावी परीक्षा ः तीन शाळांचा निकाल शंभर टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका शाळांचा निकाल घटला
दहावी परीक्षा ः तीन शाळांचा निकाल शंभर टक्के
महापालिका शाळांचा निकाल घटला दहावी परीक्षा ः तीन शाळांचा निकाल शंभर टक्के

महापालिका शाळांचा निकाल घटला दहावी परीक्षा ः तीन शाळांचा निकाल शंभर टक्के

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ ः माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेमध्ये महापालिकेच्या १८ शाळांचा दहावीचा निकाल ९१.०९ टक्के लागला. गेल्या वर्षी ९४.११ निकाल लागला होता. त्या तुलनेत तो ३.०२ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. यंदा फक्त तीन शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. नेहमीप्रमाणे क्रीडा प्रबोधिनी विद्यालय आणि पिंपरीनगरचा निकाल शंभर टक्के लागला. महापालिकेच्या एकूण १८ शाळांमधील दोन हजार ३५४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी एक हजार ९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पिंपरीनगर, क्रीडाप्रबोधिनी आणि खराळवाडी यी तीन शळांचा १०० टक्के, तर रूपीनगर माध्यमिक विद्यालयाचा सर्वात कमी ७१.३० टक्के निकाल लागला आहे.


महापालिका माध्यमिक विद्यालयांची टक्केवारी
१) भोसरी माध्यमिक विद्यालय : ९२.५१
२) कासारवाडी माध्यमिक विद्यालय : ९१.८३
३) नेहरुनगर माध्यमिक विद्यालय : ९१.९५
४) केशवनगर माध्यमिक विद्यालय : ९२.२४
५) काळभोरनगर माध्यमिक विद्यालय : ९४.४४
६) फुगेवाडी माध्यमिक विद्यालय : ९६.२९
७) उर्दू माध्यमिक विद्यालय : ९७.८५
८) संत तुकाराम माध्यमिक विद्यालय : ९७.३६
९) निगडी माध्यमिक विद्यालय : ९१.११
१०) पिंपळे सौदागर माध्यमिक विद्यालय : ८३.६०
११) खराळवाडी माध्यमिक विद्यालय : १००
१२) पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालय : ८६.७६
१३) लांडेवाडी माध्यमिक विद्यालय : ८७.२३
१४) रुपीनगर माध्यमिक विद्यालय : ७१.३०
१५) क्रीडा प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय : १००
१६) वाकड माध्यमिक विद्यालय : ८८.८७
१७) पिंपरी नगर माध्यमिक विद्यालय :१००
१८) थेरगाव माध्यमिक विद्यालय : ७६.३१

नऊ वर्षाची टक्केवारी
-२०१४ - ९४.००
-२०१५ - ९१.३२
-२०१६ - ८७.९२
-२०१७ - ८२.२१
-२०१८ - ८५.२१
-२०१९ -६१.९२
-२०२० -९४.११
-२०२१ -९४.११
-२०२२ - ९१.०९

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80901 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top