ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू कुस्ती केंद्रामध्ये घडतील आमदार महेश लांडगे यांचा विश्‍वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू 
कुस्ती केंद्रामध्ये घडतील 
आमदार महेश लांडगे यांचा विश्‍वास
ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू कुस्ती केंद्रामध्ये घडतील आमदार महेश लांडगे यांचा विश्‍वास

ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू कुस्ती केंद्रामध्ये घडतील आमदार महेश लांडगे यांचा विश्‍वास

sakal_logo
By

पिंपरी, ता. १८ : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे कामकाज करीत असताना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेले स्थानिक खेळाडू, प्रशिक्षकांच्या अनुभवाचा फायदा करुन घ्यावा. या कुस्ती केंद्रात ऑलिम्पिकच्या तयारीचे क्रीडापटू तयार होतील, असा विश्‍वास भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
महापालिका ई-क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने भोसरीतील पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या कामकाजासंदर्भात शनिवारी (ता. १८) आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, ‘ई’ क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पहिलवान नरसिंग यादव, पै. अजय लांडगे, पै. किशोर नखाते यांच्यासह क्रीडा, स्थापत्य आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मॅट, आखाडा, प्रशिक्षक नियुक्ती, व्यायाम साहित्य, निवास व्यवस्था, स्वच्छता आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.
आमदार लांडगे म्हणाले की, राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केलेल्या स्थानिक पैलवान, प्रशिक्षकांच्या अनुभवाचा या केंद्राच्या कामकाजात फायदा करुन घ्यावा. राजकीय हस्तक्षेप विरहीत कामकाज केले पाहिजे. शहरातील गरीब खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. आगामी काळात ‘साई’ संस्थेच्या नियमांच्या धर्तीवर कुस्ती केंद्रासाठी नियमावली तयार करावी.

‘सीएसआर’ फंडातून कुस्ती केंद्र चालवू
कुस्ती केंद्र चालवण्यासाठी लोकप्रतिनधी पुढाकार घेतील. या ठिकाणी येणाऱ्या खेळाडूंना सर्व व्यवस्था मोफत असेल. तसेच प्रशासनाने कुस्ती केंद्राच्या कामकाजासाठी वर्षाला किती खर्च येईल? याचे बजेट तयार करावे. महापालिका आणि सीएसआर फंडाच्या माध्यातून केंद्र, शाळा आणि रुग्णालयाचीही व्यवस्था करता येईल. कुस्ती संकुलासाठी एखाद्या नामांकीत संस्थेची नेमणूक करता येईल, असे आमदार लांडगे यांनी सांगितले.
फोटोः 71982

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81269 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top