पालेभाज्यांची आवक ५० टक्क्यांनी कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालेभाज्यांची आवक ५० टक्क्यांनी कमी
पालेभाज्यांची आवक ५० टक्क्यांनी कमी

पालेभाज्यांची आवक ५० टक्क्यांनी कमी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ : उन्हाळ्यामुळे पाण्याची कमतरता जाणवत आहे. कूपनलिका तसेच पाण्याचा स्त्रोत असणारी इतर ठिकाणे घटल्यामुळे शेतमालाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तसेच, उन्हाचा तडाखाही अद्याप तीव्र असल्यामुळे शेतातून मंडईमध्ये येणाऱ्या फळभाज्या व पालेभाज्यांचे प्रमाण घटले आहे. पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत गेल्या आठवड्यापासून पालेभाज्यांची आवक ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून मंडईत येणाऱ्या पालेभाज्यांचे प्रमाण निम्म्याने कमी झाले आहे. अद्यापपर्यंत पावसाने पाठ फिरवली आहे. विहिरींना पाणी कमी झाल्याने शेतमालाला पाणी पुरत नाही. अनेक ठिकाणच्या शेतातील पालेभाज्या जागेवरच करपून गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या काही फळभाज्यांसह पालेभाज्यांचा बाजार तेजीत आहे. प्रत्येकी पालेभाजी कोथिंबीर, शेपू, पालक, मेथी २० ते २५ रुपयांना गड्डी आहे. सध्या इंधन तसेच किराण्यासह भाजीपालाही महागल्याने गृहिणींनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
--
श्रावण महिन्यानंतर आवक वाढेल. पाऊस अद्याप सुरु नाही. तसेच, ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांचा मालाचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे सध्या बाजार तेजीत आहे.
- राजू शिंदे, पिंपरी उपबाजार समिती, विभाग प्रमुख

----
हे महागले आहे...
पावटा : ७० ते ८०, राजमा : ७० ते ८०, शेवगा : ७० ते ८०, गवार : ५० ते ६०, वाटाणा : १२०, वांगी : ५० ते ६०, कारले : ५० ते ६०, टोमॅटो : ६० ते ८०
---

पिंपरी मंडईत रविवारी (ता.१९) तारखेला झालेली आवक

भाजीपाला क्विंटलमध्ये
कांदा १५
भेंडी २
टोमॅटो ७
दोडका १
दुधी भोपळा २
काकडी ४
फ्लॉवर ८
कोबी ८
वांगी १
कैरी १
घोसाळी १
मका २
------
पालेभाज्या नगमध्ये
कोथिंबीर १२००
चवळी १५००
अंबाडी ८००
पुदीना १४००
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81564 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top