नवकल्पना, तंत्रज्ञानांची शनिवारपासून सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवकल्पना, तंत्रज्ञानांची 
शनिवारपासून सादरीकरण
नवकल्पना, तंत्रज्ञानांची शनिवारपासून सादरीकरण

नवकल्पना, तंत्रज्ञानांची शनिवारपासून सादरीकरण

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ ः केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेला शनिवारी (ता. २५) सात वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीअंतर्गत उभारलेले प्रकल्प, नवकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती नागरिकांना देण्यासाठी शनिवारपासून सोमवारपर्यंत (ता. २७) ‘सबका भारत, निखरता भारत’ संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात विद्यार्थी, नागरिक, शैक्षणिक, सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी केले.
इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर यांच्या सहकार्याने इंटरकॉलेजिएट बिझनेस प्रोजेक्ट अशा ‘उदान’ (यूडीएएएन) स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. आयसीसीसी, एबीडी एरिया, ८ टू ८० पार्क, सीसीटीव्ही, ई-क्लासरुम, पदपथ, स्टार्टअप अशा नव तंत्रज्ञान व कौशल्यपूर्ण प्रकल्पांची नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. ड्रेनेज सोल्यूशन, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट सोल्युशन, पर्यावरण, शहर स्वच्छता आदींवर नागरिकांनी सूचना मांडाव्यात, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81630 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top