देहू-आळंदीला छावणीचे स्वरूप कडेकोट पोलिस बंदोबस्त, लाखो भाविक दाखल, वाहतूक मार्गात बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहू-आळंदीला छावणीचे स्वरूप
कडेकोट पोलिस बंदोबस्त, लाखो भाविक दाखल, वाहतूक मार्गात बदल
देहू-आळंदीला छावणीचे स्वरूप कडेकोट पोलिस बंदोबस्त, लाखो भाविक दाखल, वाहतूक मार्गात बदल

देहू-आळंदीला छावणीचे स्वरूप कडेकोट पोलिस बंदोबस्त, लाखो भाविक दाखल, वाहतूक मार्गात बदल

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ : आषाढी वारीसाठी देहूतून श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी (ता. २०) तर आळंदीतून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी (ता. २१) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी देहू-आळंदीत कडेकोट पोलिस तैनात केला असून, वाहतूक मार्गातही बदल केले आहेत.

प्रस्थान सोहळ्यासह वारीला जाण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहू-आळंदीत दाखल झाले आहेत. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामार्फत ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. मुख्य मंदिरासह, गोपाळपूर, नदी घाट, पहिला मुक्काम, महत्त्वाचे चौक आदी ठिकाणी पोलिस नजरेस पडत आहेत.
-------------
देहू परिसरात वाहतुकीत बदल

तळवडे वाहतूक विभागात रविवार ते बुधवारपर्यंत वाहतुकीत बदल केले आहेत. मुंबई - पुणे महामार्गावरील देहूगाव कमान ते परंडवाल चौक, देहूगाव हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद केला आहे. त्यासाठी पर्यायी रस्ता - भक्ती-शक्ती चौक -त्रिवेणीनगर- तळवडे गावठाण -कॅनबे चौक -खंडेलवाल चौक, देहूगाव असा राहील. तसेच तळवडे गावठाण चौक ते कॅनबे चौक ते महिंद्रा सर्कल हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. त्यासाठी पर्यायी रस्ता - तळवडे गावठाण - चिखली ते डायमंड चौक ते मोईगावमार्गे निघोजे एमआयडीसी असा राहील. यासह तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहूफाटा येथून देहूगावकडे जाणाऱ्या मार्गावर जड वाहनांना मनाई.
परंडवाल चौक ते देहू कमान चौक हा रस्ता व्हीआयपी व्यक्तींच्या वाहनांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद. देहू कमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद.
देहूरोडमधील सेंट्रल चौक ते देहूकमानकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. या मार्गावरील वाहने सेंट्रल चौक, मामुर्डी, किवळे, भुमकर चौक, डांगे चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. भक्ती - शक्ती चौक येथे मुंबईकडून येणारी वाहतूक जुन्या मुंबई - पुणे महामार्गाने जाण्यास मनाई आहे.
----

आकुर्डीतही बदल

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आकुर्डी येथे पोहोचल्यानंतर म्हाळसाकांत चौकाकडून येणारी वाहतूक आकुर्डी गावठाण, खंडोबा माळ चौकाकडे येऊ न देता ती टिळक चौक मार्गाने वळविण्यात येईल. काळभोरनगरपासून भक्ती-शक्ती चौकाकडे जाणारी वाहने ग्रेड सेपरेटरमधून वळतील. बिजलीनगर चौकाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे वाहने न सोडता ती रावेतमार्गे मुंबईकडे जातील.

तसेच बुधवारी (ता. २२) सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भोसरी परिसरातीलही वाहतुकीत बदल केले आहेत. भोसरी आळंदी चौक, जय गणेश साम्राज्य चौक व भोसरी दिघी चौकातून पुणे - आळंदी रस्त्याकडे जाण्यास बंदी असेल. या मार्गावरील वाहने चिंबळी फाटा, चाकण मार्गे इच्छित स्थळी जातील. नाशिक - पुणे रस्त्याने नाशिक फाटा येथे मुंबई - पुणे महामार्गावर जाण्यास वाहनांना बंदी राहील. या मार्गावरील वाहने नाशिक फाटा उड्डाणपुलावरून सांगवी, पिंपळे-गुरव मार्गे इच्छित स्थळी जातील.
----------------------

असा असेल पोलिस बंदोबस्त
उपायुक्त -३
सहायक आयुक्त - ८
निरीक्षक -४८
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक -१२८
कर्मचारी - १७३२
एसआरपीएफ -१ तुकडी.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81701 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top