
थेरगावात आरोग्य जनजागृती अभियान
पिंपरी, ता. २३ : सेवा सहयोग ऊर्मी प्रकल्पांतर्गत संस्कार प्रतिष्ठान आणि आदर्श महिला बचत गट थेरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श कॉलनी बेलठीकानगर, थेरगाव येथे मासिक पाळी व आरोग्य जनजागृती अभियान राबविले.
गौरी पेंडसे यांनी ३५ महिलांना मार्गदर्शन केले. मुलींना मासिक पाळी संबंधित शास्त्रीय माहिती, तसेच योग्य आहार, व्यायाम आणि रेड डॉट बॅगविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
महिलांना रेड डॉट बॅग प्रशिक्षण देत ते वापरण्याचे आवाहन केले. सर्व महिलांना मैत्रीण सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड आणि आदर्श महिला बचत गटाच्या अध्यक्षा वैशाली खुडे यांनी हे सत्र आयोजित केले होते. माजी नगरसेविका ममता गायकवाड, शिक्षण मंडळ सभापती मनिषा पवार, सामाजिक कार्यकर्त्या करिष्मा बारणे, नम्रता भिलारे उपस्थित होत्या.
------------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m82983 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..