भाविकांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या टोळ्या जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाविकांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या टोळ्या जेरबंद
भाविकांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या टोळ्या जेरबंद

भाविकांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या टोळ्या जेरबंद

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ : आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात व देहूत श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाविकांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या टोळ्यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. साठ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देहू, आळंदीतून पंढरीकडे मार्गस्थ होणाऱ्या या पालखी सोहळ्यात चोरीच्या मोठ्याप्रमाणात घटना घडतात. या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखेने वेगवेगळी पथके तयार केली होती. या पथकाने अनेक जणांवर कारवाई करीत मुद्देमाल जप्त केला.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पोलिसांनी संशयित ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली, तसेच गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या मंगळसूत्र, पाकीट चोरी करणाऱ्या अहमदनगर, लातूर व बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांतील एकूण २३ आरोपींना रंगेहात पकडले. या आरोपींवर देहूरोड व निगडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून दोन लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ३७ जणांना अटक केली. या आरोपींकडून दिघी व आळंदी पोलिस ठाण्यात दाखल असलेले बारा गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने व चाळीस हजारांचे तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले.

----------------------
बालगुन्हेगारी रोखण्याचे आव्हान
शहरात बालगुन्हेगारीसह वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याचे प्रमाण अधिक आहे. गंभीर गुन्ह्यात बालगुन्हेगारांचा लक्षणीय सहभाग असल्याचे दिसून येते. बालगुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. गुन्हा घडण्याची कारणे, पालकांशीही संवाद साधणे आदींच्या माध्यमातून मार्ग काढत उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे अंकुश शिंदे यांनी स्पष्ट केले.
-------------------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83162 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top