खासगी वाटाघाटींच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी महापालिका प्रशासक पाटील यांची मान्यता; साडेसात कोटी अपेक्षित खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी वाटाघाटींच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी

महापालिका प्रशासक पाटील यांची मान्यता; साडेसात कोटी अपेक्षित खर्च
खासगी वाटाघाटींच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी महापालिका प्रशासक पाटील यांची मान्यता; साडेसात कोटी अपेक्षित खर्च

खासगी वाटाघाटींच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी महापालिका प्रशासक पाटील यांची मान्यता; साडेसात कोटी अपेक्षित खर्च

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ ः मंजूर विकास योजनेतील रस्ते व आरक्षणाने बाधित क्षेत्राचा मोबदला संबंधित मिळकतधारकांस खासगी वाटाघाटीने देण्यास खासगी वाटाघाटी समितीने मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने लागणारे मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, वकील शुल्क व इतर आनुषंगिक कामांसाठी सात कोटी ५५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासह स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध कामांसाठी येणाऱ्या सुमारे ४४ कोटी ८७ लाख रुपये खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.

ठाणे महापालिकेच्या सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर संलग्न परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात महापालिका प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरू करणार आहे. त्यास ‘पिंपरी-चिंचवड महापालिका संचालित ‘सावित्रीबाई फुले अकादमी’ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक पिंपरी’ असे नाव दिले जाणार आहे. तसेच, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) पदव्युत्तर संस्था येथील मध्यवर्ती निर्जंतुकीकरण केंद्र (सीएसएसडी) अद्ययावत व नूतनीकरण करण्यास १७ कोटी ५८ लाख रुपये खर्च होणार आहे. त्यासही प्रशासकीय मान्यता दिली.

मान्यता मिळालेले विषय
- भूमकर चौक ते महापालिका हद्दीपर्यंतच्या कामास स्थळबदल करण्यास मान्यता
- टेल्को रस्त्यावरील केएसबी चौक ते यशवंतनगर चौक रस्त्याचे डांबरीकरण
- अग्निशमन विभागातील कर्मचारी प्रशिक्षण पाठ्यक्रम धोरण ठरविणे
- महापालिकेच्या जागेवर मल्टी लेव्हल पार्किंग कम कमर्शिअल डेव्हलपमेंट फॅसिलीटीचे डिझाईन (बिल्ट, फायनान्स, ऑपरेट व ट्रान्स्फर) विकसित करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करणे

स्थायीच्या मान्यतेचे विषय
- चिखली मोरेवस्ती, सोनावणेवस्ती, म्हेत्रेवस्ती परिसरात जलनिःसारण कामांसाठी ः ३२ लाख ९३ हजार
- भोसरी येथील विविध रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी ः ३९ लाख
- देहूरोड लष्करी परिसरात एक लाख वृक्षारोपण व दोन वर्ष देखभालीसाठी वनविकास महामंडळाकडे सोपविणे ः ७ कोटी ६८ लाख
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, दुर्गा देवी, भोसरी सहल केंद्र. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, वीर सावरकर (गणेश तलाव) उद्यानांच्या देखभालीसाठी ः ४ कोटी ८७ लाख
- भोसरी प्राधिकरण पेठ ७ (बेसिन-डी),पेठ १० (बेसिन एबी) व मध्यवर्ती सुविधा केंद्रामधील पावसाळी पाणी व्यवस्थापन,नाला सुशोभीकरणासाठी ः १ कोटी २२ लाख
- ‘ह’ प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्यासाठी ः १ कोटी ३१ लाख

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83218 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top