मोरवाडीतील विद्यार्थ्यांची महिंद्रा कंपनीमध्ये निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरवाडीतील विद्यार्थ्यांची 
महिंद्रा कंपनीमध्ये निवड
मोरवाडीतील विद्यार्थ्यांची महिंद्रा कंपनीमध्ये निवड

मोरवाडीतील विद्यार्थ्यांची महिंद्रा कंपनीमध्ये निवड

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः चाकण येथील महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीमार्फत शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा घेण्यात आला. त्याला महापालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी येथील प्रशिक्षणार्थींची अप्रेंटीसशिपसाठी निवड करण्यात आली.
या कंपनीमार्फत शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा घेतला. त्यात संस्थेमधील टर्नर, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेहिकल, वेल्डर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, पेंटर जनरल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व कोपा या ट्रेड्समधील एकूण २५० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. सहभागी झालेले सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून ‘ऑफर लेटर’ देण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांचे अंतिम व्यवसाय परीक्षांचे निकाल लागल्यानंतर त्यांना कंपनीमध्ये प्रत्यक्ष नियुक्ती दिली जाणार आहे. आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त (३) उल्हास जगताप, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याचे आयोजन संस्थेमधील निदेशक जे. ई. ढेकळे, निदेशक एस. एम.आनंदकर, पी. पी. घोडके यांनी केले.

कोट
उद्योगांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ‘आयटीआय’ प्रशिक्षित विद्यार्थ्यांची मागणी वाढली आहे. विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळत असल्याने अनेक कंपन्यांमध्ये हे विद्यार्थी चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. शिवाय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास रोजगार उपलब्ध होत असल्याने निमशहरी; तसेच ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी ‘आयटीआय’मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेत आहेत.
-शशिकांत पाटील, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83690 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..