रोजगाराभिमुख ३० नवीन ट्रेड महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोजगाराभिमुख ३० नवीन ट्रेड
महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुविधा
रोजगाराभिमुख ३० नवीन ट्रेड महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुविधा

रोजगाराभिमुख ३० नवीन ट्रेड महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुविधा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः मुलांनो! तुम्हा दहावी, बारावी उत्तीर्ण झालात? व्यावसायिक शिक्षण घ्यायचंय? ड्रोन टेक्नोलॉजी शिकायची आहे. स्मार्ट सिटी टेक्नोलॉजी, मॅकेट्रोनिक्स किंवा इलेक्ट्रिक वेहिकल टेक्नोलॉजी शिकायची आहे. याची व्यवस्था महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अर्थात आयटीआयमध्ये उपलब्ध झाली आहे. कारण, उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी नावीन्यपूर्ण ३० ट्रेड्स सुरू करण्याचे महापालिकेचे धोरण आहे.
महापालिकेचे मोरवाडीत मुलांसाठी व कासारवाडीत मुलींसाठी स्वतंत्रपणे ‘आयटीआय’ आहे. त्यातील ट्रेड्समध्ये कालानुरूप बदल करून कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुख ट्रेड्स सुरू केले जाणार आहेत. यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. शिवाय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उत्पादनभिमुख प्रशिक्षण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबतचा सरकारचा निर्णय आहे. त्यानुसार महापालिकेच्या आयटीआयमध्ये योजना राबविण्यासाठी धोरण निश्चित केले असून, त्यास महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती. ती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली आहे.

प्रशिक्षण योजनेंतर्गत ट्रेडस्
ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, शिवणक्लास, सर्फेस ओर्नामेंटेशन टेक्निक्स, मेकॅनिक अॅग्रीकल्चरल मशिनरी, मेकॅनिक ऑटो बॉडी पेंटिंग, मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक टू अँड थ्री व्हीलर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, बेसिक कॉसमेटोलॉजी, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर टेक्निशियन, फाउन्ड्रीमॅन, फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, मरीन फिटर, मेकॅनिक मशिन टूल्स मेंटेनन्स, ऑपरेटर अॅडवान्स मशिन टूल्स, टूल्स अँड डाय मेकर, टर्नर, अॅरोनॉटीकल स्ट्रक्चर इक्विपमेंट फिटर, शीट मेटल वर्कर, वेल्डर, इलेक्ट्रोप्लेटर, लॅब्रोटरी असिस्टंट, प्लॅस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, कारपेंटर, इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन, सर्वेअर, पेंटर, इलेक्टॉनिक्स मेकॅनिक, बेकर, फूड प्रोडक्शन, फ्रूट अँड व्हेजिटेबल्स प्रोसेसिंग, फिजिओथेरपी टेक्निशियन, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोगामिंग असिस्टंट, इन्फोर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मॅनेजमेंट, मल्टिमीडिया, अॅनिमेशन अँड स्पेशल इफेक्ट्स, डिजिटल फोटोग्राफर, सेक्रेटेरियल प्रॅक्टीस (इंग्रजी), स्टेनोग्राफर सेक्रेटेरियल असिस्टंट(इंग्रजी), एससीव्हीटी- स्टेनोग्राफी (मराठी), प्लंबर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, लिफ्ट मेकॅनिक, रबर टेक्निशियन, फायर टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रिअल सेफ्टी मॅनेजमेंट, टेक्स्टाईल मॅनेजमेंट, स्पिनिंग टेक्निशियन, ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल, डेंटल लॅब्रोटरी इक़्विपमेंट टेक्निशियन, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, फ्रंट ऑफिस असिस्टंट, हॉस्पिटल हाउसकिपिंग, हाउसकिपर आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

योजनेची वैशिष्ट्ये...
- उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनांची अर्थात कमवा व शिका योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे
- कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे, प्रशिक्षणासाठीच्या कच्च्या मालावरील खर्चात बचत करणे
- प्रशिक्षणार्थींच्या प्रात्यक्षिक कौशल्यात व सरावात वाढ करूनरोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवणे
- प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन कामाबाबत आत्मविश्वास व आवड निर्माण करणे
- उपलब्ध यंत्र, साधने व मनुष्यबळाद्वारे संस्थेला उत्पन्न मिळवून देणे, आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करणे
- कारखाने, कंपन्या, शासकीय व निमशासकीय आस्थापनांशी संबंध निर्माण करून प्रशिक्षणार्थ्यांना लाभ देणे
- उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेचे बळकटीकरण, नावीन्यता, सुलभीकरण व कायमस्वरूपी उत्पन्न स्रोत निर्मिती

ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, शिवणक्लास, सर्फेस ओर्नामेंटेशन टेक्निक्स या ट्रेड्समध्ये गणवेष तयार करणे, डांगरी तयार करणे, खिडक्या किंवा दरवाजांचे पडदे तयार करणे, कोच कव्हर, कपड्यांना शिलाई करणे, शिलाईचे सर्व प्रकार असे स्वरूप
असेल. उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी धोरण निश्चित करताना मार्गदर्शक सूचना, उत्पादन प्रक्रियेत भाग घेणाऱ्या कर्मचारी आणि प्रशिक्षाणार्थ्यांच्या मानधनाची रचना, वस्तूची किंमत, मशिनचा प्रतितास खर्च, मजुरीचा प्रतितास दर आदींची परिगणना करण्याची पद्धती निश्चित केली आहे.
- शशिकांत पाटील, प्राचार्य, महापालिका आयटीआय, मोरवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83706 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top