कचऱ्याच्या धुराने नागरिक त्रस्त निगडी परिसरातील समस्या, प्रश्‍न सोडवण्याचे आयुक्तांचे आश्‍वासन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचऱ्याच्या धुराने नागरिक त्रस्त
निगडी परिसरातील समस्या, प्रश्‍न सोडवण्याचे आयुक्तांचे आश्‍वासन
कचऱ्याच्या धुराने नागरिक त्रस्त निगडी परिसरातील समस्या, प्रश्‍न सोडवण्याचे आयुक्तांचे आश्‍वासन

कचऱ्याच्या धुराने नागरिक त्रस्त निगडी परिसरातील समस्या, प्रश्‍न सोडवण्याचे आयुक्तांचे आश्‍वासन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचरा निगडीतील जुना जकात नाक्यासमोरील कचरा डेपोत आणून टाकला जातो. या कचऱ्यास वारंवार आग लागते. त्याच्या धुराच्या उग्र वासाचा त्रास निगडी परिसरातील रहिवाशांना होत आहे. यामुळे रूपीनगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे हा कचऱ्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा, अशी मागणी रुपीनगर नागरी कृती समितीने केली आहे. ‘हा गंभीर प्रश्‍न लवकरात लवकर सोडण्यात येईल,’ असे आश्‍वासन आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी दिले.
याबाबत रुपीनगर नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा निगडीतील रूपीनगरजवळील मोकळ्या माळरानावर कचरा डेपो आहे. याठिकाणी देहूरोड परिसरासह निगडी भागातील काही हॉटेलचा ओला कचराही टाकला जातो. कचरा डेपोला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी या डेपोला मोठी आग लागली होती. निगडीसह यमुनानगर भागातही धुराचे लोट दिसत होते. ही आग अजूनही धुमसत आहे. धुराचा वास उग्र असून, हा धूर आरोग्यासाठी घातक आहे. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रूपीनगर, तळवडे, से. क्र. २२, निगडी गावठाण, साईनाथनगर व यमुनानगरच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हा कचरा डेपोच येथून स्थलांतरित करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
कृती समितीच्या मागण्यांची दखल घेत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व ‘हा गंभीर प्रश्न लवकरात लवकर सोडण्यात येईल’, असे आश्‍वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, पंकज भालेकर, कृती समितीचे उपाध्यक्ष धनंजय भालेकर, सचिव संदीप जाधव, एस. डी. भालेकर, अरूण थोपटे, रवी सोनवणे, सुखदेव म्हस्के, नाना मालुसरे, दादा सातपुते, अनिल भालेकर, रामदास कुटे, प्रतिक शिंदे, तेजस मालुसरे, देहूरोड कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी राजेंद्र सावंत, तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंटचे किरण गोटे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83715 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top