
अण्णासाहेब मगर यांना महापालिकेत अभिवादन
पिंपरी, ता. २५ ः पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेतर्फे त्यांच्या पुतळ्यास प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते. एकदा खासदार व चार वेळा आमदार झालेले अण्णासाहेब मगर १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सक्रीय होते. त्यांच्या प्रयत्नातून ४ मार्च १९७० रोजी पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना झाली. १९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आली. १२ मार्च १९७२ रोजी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) स्थापना केली, असे आयुक्तांनी सांगितले.
--
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83720 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..