नवी सांगवीतील शाळेला ‘कारणे दाखवा’ नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी सांगवीतील शाळेला
‘कारणे दाखवा’ नोटीस
नवी सांगवीतील शाळेला ‘कारणे दाखवा’ नोटीस

नवी सांगवीतील शाळेला ‘कारणे दाखवा’ नोटीस

sakal_logo
By

पिंपरी, ता.२५ ः नवी सांगवीतील एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारत असल्यामुळे शाळेवर तात्काळ बेकायदेशीर शुल्क कमी करण्याची मागणी कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड व पालकांनी शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, शिक्षणाधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद पुणे व प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महापालिका यांच्याकडे केली होती. या प्रकरणी या शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या शाळेने सन २०२१-२२ मध्ये १५ हजार वार्षिक शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतले होते, परंतु सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ४५ हजार रुपये इतके शुल्क भरण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम २०११, २०१६ व २०१८ नुसार १५ टक्के शुल्कवाढ करणे अपेक्षित असतानादेखील शाळेने २०० टक्के अतिरिक्त शुल्कवाढ केली आहे.
या शाळेतील विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारत असल्यामुळे शाळेची मागील सात वर्षापासूनची आर्थिक, शैक्षणिक, व प्रशासनिक तपासणी, इपीटीए अहवाल व लेखापरीक्षण करून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात वाढवलेली बेकायदेशीर शुल्क तात्काळ कमी करण्याची मागणी पालकांनी कॉप्स विद्यार्थी संघटनेकडे केली होती. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ नुसार शाळा कोणताही नफा मिळवण्यासाठी चालविण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे
सीबीएससीच्या कायद्यानुसार २०१८ मधील प्रकरण १२ अन्वये कारवाई करनेबाबत सीबीएससी दिल्ली यांच्याकडे का कळविण्यात येऊ नये ? तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २००९ मधील तरतुदीनुसार आपल्या शाळेची मान्यता व ना हरकत दाखला रद्द करण्याबाबत कारवाई प्रस्तावित करण्यात का येऊ नये, याबाबतचा खुलासा ३ दिवसाच्या आत कार्यालयास सादर करण्याचे आदेश प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83802 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top