पर्यावरण संवर्धनासाठी २५० शाळांत वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण संवर्धनासाठी २५० शाळांत वृक्षारोपण
पर्यावरण संवर्धनासाठी २५० शाळांत वृक्षारोपण

पर्यावरण संवर्धनासाठी २५० शाळांत वृक्षारोपण

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेस सात वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका, स्मार्ट सिटी व मुख्याध्यापक महासंघ यांच्यातर्फे शनिवारपासून ते सोमवारपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ‘सबका भारत, निखरता भारत’ या कल्पनेवर आधारित उपक्रमात विविध शाळांचे विद्यार्थी, नागरिक, संस्था संघटना सहभागी झाले होते. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी २५० हून अधिक शाळांच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन मोहीम राबविण्यात आली.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत स्मार्ट सिटी मिशनचा सातवा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या सात वर्षात हरित शहर, नव्याने विकसित प्रकल्प, नवकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचा प्रारंभ निगडी प्राधिकरणातील कीर्ती विद्यालयात शनिवारी (ता. २५) आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाला. स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, क्षेत्रिय अधिकारी शीतल वाकडे, मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षा प्राचार्या साधना दातीर, कीर्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक जाधव, वसंतदादा हायस्कूलच्या मुख्याध्यापक नेहा पवार, मुख्य लिपिक वैशाली सानप आदी उपस्थित होते.

असे आहेत उपक्रम
- शून्य कचरा व्यवस्थापन मोहीम, शाळांनी झाडांचा पालापाचोळा, कचरा व्यवस्थापन, कचरा कंम्पोस्टींग, गांडूळ खत तयार करून बागकामासाठी वापरण्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जागृती करणे.
- आपल्या मनातील सुंदर शहर प्रत्यक्षात उतरविण्यासाठी २४ ते ३० जून कालावधीत ऑनलाइन निबंध, चित्रकला, फोटोग्राफी व प्रश्नमंजूषा स्पर्धेत विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी होणे. थंड आणि ऊर्जा कार्यक्षम इमारत बांधकाम पद्धती.
- स्मार्ट सिटी प्रकल्पांचा पाहणी दौरा, क्युरेटेड ट्रीप, प्रवासाचे चित्रांकन, हवामान जागरूकता, लोकांची मते जाणून घेणे, सार्वजनिक जागा सुधारणे, तरुण उद्योजकांसाठी तंत्रज्ञानावर आधारित ‘आयडियाथॉन’ व नागरी उपायांची अंमलबजावणी.
- शाळांमध्ये प्रश्नमंजूषा, सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, रेडिओ शो, कौशल्य विकास केंद्रात नवोपक्रम मेळावे, देशी वृक्ष लावण्यासाठी जागृती, शहरी शेतीवरील कार्यशाळा घेणे. कौशल्य विकास केंद्रातील उत्पादनांचे प्रदर्शन, प्लेसमेकिंग.

शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरण पूरक राहणीमानाबददल जागरूक करणे गरजेचे आहे. प्लॅस्टिक मुक्ती, पृथ्वीच्या रक्षणाबाबत जनजागृतीपर धडे देवून पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभागी करून घ्यावे.
- राजेश पाटील, प्रशासक, महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83864 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..