बिजलीनगरचा बसथांब्याला निवारा शेड करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिजलीनगरचा बसथांब्याला 
निवारा शेड करण्याची मागणी
बिजलीनगरचा बसथांब्याला निवारा शेड करण्याची मागणी

बिजलीनगरचा बसथांब्याला निवारा शेड करण्याची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ ः चिंचवड - बिजलीनगर येथील प्रवाशांना उभे राहण्यासाठी निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशीवर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी बसथांबा निवारा शेड उभारण्याची मागणी प्रवासी वर्गांतून होत आहे.
बिजलीनगर भागात हनुमान स्वीटसच्या समोरील बाजूस राजर्षी शाहू उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून सुरु होते. कामासाठी या मार्गावरील अनेक ठिकाणचे बस थांबे व सावलीचा आधार असलेली शेड तोडण्यात आल्यामुळे अनेक वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस तसेच आता पावसात वाहनांची वाट पाहत उभे राहणाऱ्या प्रवासी वर्गांमध्ये मनस्ताप होत आहे. अलीकडील बाजूला पदपथावर चिंचवडगावाकडे जाणाऱ्या पीएमपीएलच्या बसगाड्यांसाठी यापूर्वी बसथांबा होता. रस्त्याच्या कामासाठी ४ वर्षापासून निवाराशेड काढून टाकण्यात आली आहे. थांबा शेड तोडल्याने सद्यपरिस्थितीत प्रवाशांना मोठ्या प्रमाणात उन्हाचा, पावसाचा त्रास सहन करावे लागत असल्याचे प्रवासी मुरलीधर चोपडे व चंद्रकांत महाजन यांनी सांगितले. सद्यपरिस्थितीत प्रवाशांना मोठ्या प्रमाणात पावसाचा त्रास सहन करावा लागत आहेत. त्यामुळे बिजलीनगर मार्गावर तात्पुरती का होईना पण प्रवाशांसाठी निवारा शेड उभारावी व प्रवासी वर्गाला दिलासा मिळावा, अशी मागणी प्रवासी रवींद्र माळवदे यांनी केली आहे.


प्रवासी प्रदीप चिकोडीकर व बाबूराव काकडे म्हणाले, ‘‘या ठिकाणी निवारा शेड नसल्याने प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उभे राहून, वाहनांची वाट बघावी लागत आहे. या मार्गावर छोट्या-मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, प्रवाशांना रस्त्यावर उभे राहणे कठीण व धोकादायक झाले आहे. ’’
‘‘प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवून बिजलीनगरमध्ये सुसज्ज बसथांबा उभारण्यासंबधित प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे,’’ अशी मागणी बजरंग माने व राजेश जगताप या प्रवाशांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84269 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..