शालेय उपक्रमांमधून सुप्तगुणांचा शोध : जयश्री येवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय उपक्रमांमधून सुप्तगुणांचा शोध : जयश्री येवले
शालेय उपक्रमांमधून सुप्तगुणांचा शोध : जयश्री येवले

शालेय उपक्रमांमधून सुप्तगुणांचा शोध : जयश्री येवले

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ ः ‘‘शालेय उपक्रमांमधून सुप्तगुणांचा शोध घेण्याची संधी विद्यार्थ्यांना लाभत असते, म्हणून त्यात सहभागी होऊन संधीचे सोने करीत व्यक्तिमत्त्व समृद्ध करा!’’ असा कानमंत्र जयश्री येवले यांनी विद्यार्थ्यांना दिला.
थेरगाव-गणेशनगर येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित खिंवसरा पाटील विद्यामंदिरात त्या बोलत होत्या. यावेळी जनलोक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुनंदा कदम, सहखजिनदार शशिकला भोंग, सदस्य सविता कांचन, क्रांतिवीर चापेकर, स्मारक समिती संचालक आसाराम कसबे, माधुरी कुलकर्णी, मीना जाधव, वीणा तांबे, सीमा आखाडे, गणेश शिंदे, संदीप बरकडे, कृतिका कोराम आदी उपस्थित होते.
यावेळी लहान गटातील कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या इयत्ता सातवीतील विजय गायकवाड या विद्यार्थ्याचा तसेच ‘सानेगुरुजी शिक्षक प्रतिभा पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापक नटराज जगताप यांचा सत्कार करण्यात आला. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. नटराज जगताप यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84290 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..