गुन्हे वृत्त भोसरीत जुन्या भांडणावरून अल्पवयीन मुलाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त 
 
भोसरीत जुन्या भांडणावरून 
अल्पवयीन मुलाला मारहाण
गुन्हे वृत्त भोसरीत जुन्या भांडणावरून अल्पवयीन मुलाला मारहाण

गुन्हे वृत्त भोसरीत जुन्या भांडणावरून अल्पवयीन मुलाला मारहाण

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ : जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाला मारहाण करीत धमकी दिल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार भोसरी येथे घडला.

या प्रकरणी अजय सर्जेराव गायकवाड (वय १६, रा. शांतिनगर वसाहत, भोसरी) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखिल कसबे (वय २२, शांतिनगर, भोसरी), रोहित तुपरे (वय २२, रा. आदिनाथनगर, भोसरी) यांच्यासह आणखी दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल आहे,. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून, आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच हातात कोयते घेऊन फिर्यादी व त्यांचा भाऊ काळूराम गायकवाड यांना आमच्या नादी लागले तर वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--------------------
रावेत येथून रिक्षाची चोरी
बंद पडलेली रिक्षा रस्त्यालगत उभी केली असता, ही रिक्षा चोरट्याने लंपास केली. हा प्रकार रावेत येथे घडला.
या प्रकरणी नरेश गुलाबराव काळे (रा. रामदास नगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या रिक्षातून जात असताना रावेत येथील एस. बी. पाटील रोड येथे त्यांची रिक्षा बंद पडली. त्यामुळे त्यांनी तेथेच रिक्षा उभी केली. तीन दिवसांनी ते पुन्हा रिक्षा घेण्यासाठी गेले असता, तेथे रिक्षा नव्हती. ही रिक्षा अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--------------------
देहूत सोनसाखळी हिसकावली

पिंपरी ः देहूतील माळीनगर येथे एकाची सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली. याप्रकरणी उमेश अप्पाण्णा पाटील (रा. एकतारा सोसायटी, परंडवाल चौक, माळीनगर, देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. श्री संत तुकाराम पालखी सोहळ्यात अनेक जणांचा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. दरम्यान, मंगळवारी (ता. २१) फिर्यादी व त्यांचा मुलगा हे पालखी सोहळ्यात दर्शन घेण्यासाठी परंडवाल चौक येथे आले होते. दरम्यान, गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने फिर्यादी यांची बारा हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली. यानंतर चोरटा पसार झाला. याप्रकरणी त्यांनी रविवारी (ता. २६) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84430 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..