आढलेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आढलेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
आढलेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

आढलेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

sakal_logo
By

सोमाटणे, ता. २८ ः आढले येथील कृषी संजीवनी सप्ताहात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. कमी खर्चात अधिक उत्पादन काढण्याचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे या उद्देशाने कृषी विभाग मावळ व आढले ग्रामपंचायतीतर्फे नुकताच गावात कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला होता. यानिमित्ताने जैविक व सेंद्रिय खताचा वापर, भात लावण्याची चारसूत्री पद्धत, युरिया ब्रेकेटचा वापर, पाणी व्यवस्थापन, शासनाच्या विविध योजना, फळबाग लागवड, गांडुळ प्रकल्प, ‘महाडीबीटी’अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, शेतीपूरक व्यवसाय उभारणे याविषयी सखोल मार्गदर्शन सहायक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी संरपंच विश्वास घोटकुले, उपसरपंच प्रताप घोटकुले, नितीन घोटकुले, अश्विनी संकपाळ, सुनीता सावळे, नंदिनी कटके यांनी प्रयत्न केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84609 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..