
पिंपरी : मुलींचा आयटीआय प्रवेश सुरू
पिंपरी - महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी महापालिकेची मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय कासारवाडीत आहे. त्यात विविध ट्रेडसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने इच्छुक विद्यार्थिनींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
विविध ट्रेड्स प्रवेशासाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधून केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत कार्यवाही करावी. संस्थेतील सर्व प्रवेशित जागांवर शासन नियमावली व आरक्षणानुसार ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे (कॅप राउंड) प्रणालीनुसार १०० टक्के जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. शहरातील विद्यार्थ्यांना वार्षिक प्रशिक्षण शुल्क दीड हजार रुपये व अनामत रक्कम ६०० रुपये आहे. शहराबाहेरील विद्यार्थ्यांना वार्षिक शुल्क पाच हजार रुपये व अनामत रक्कम ६०० रुपये आकारण्यात येईल. ऑनलाइन व पर्यायी अर्ज भरण्याची सुविधा कासारवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये निःशुल्क उपलब्ध आहे. प्लेसमेंट व उद्योजकता कक्ष उपलब्ध असून आयटीआयचे प्रशिक्षण म्हणजे रोजगाराची हमी व स्वयंरोजगाराची संधी आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क - ८८०५०१३९६५, ७७२२०१०७२०, ९९२२७५७४०१, ९१४६१८५८५५, ९५७९२१३७०६, ९७६७००३५९५, ८८०५०००८६६.
महिला आयटीआय उपलब्ध ट्रेडस्
ट्रेड / कालावधी / क्षमता
कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट (कोपा) / १ वर्ष / २४
फॅशन डिझाइन अँड टेक्नॉलॉजी / १ वर्ष / २०
डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर, बेसिक कॉस्मॉटोलॉजी, हॉस्पिटल हाऊस कीपिंग / १ वर्ष / २४
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / २ वर्ष / २४
(टीप - सर्व ट्रेडसाठी प्रवेश पात्रता दहावी उत्तीर्ण)
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84652 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..