सावधान...श्वानांमध्ये ‘पार्वो’चा संसर्ग! लहान मुलांना संपर्कापासून दूर ठेवा; पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान...श्वानांमध्ये ‘पार्वो’चा संसर्ग!
लहान मुलांना संपर्कापासून दूर ठेवा; पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन
सावधान...श्वानांमध्ये ‘पार्वो’चा संसर्ग! लहान मुलांना संपर्कापासून दूर ठेवा; पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

सावधान...श्वानांमध्ये ‘पार्वो’चा संसर्ग! लहान मुलांना संपर्कापासून दूर ठेवा; पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ : शहरातील पाळीव श्वान सध्या ‘पार्वो’ या आजाराने त्रासले आहेत. यातून श्वानांचा तडफडून मृत्यू होत आहे. यामुळे घरात लहान मुले त्यासोबत खेळणारी असतील, तर त्यांनाही श्वानांपासून दूर ठेवण्याची गरज आहे. जग कोरोनाने त्रस्त आहे आणि आता श्वान सुद्धा ‘पार्वो’ या आजाराने बेजार झाले आहेत. पशुचिकित्सालयात येणाऱ्या १०० श्वानांपैकी जवळपास ६० श्वानांमध्ये हा आजार आढळत असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

शहरातील पाळीव श्वानांना उपचारासाठी वारंवार दवाखान्यात नेले जात आहे. ‘पार्वो’ या विषाणूत कुठल्याही वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता आहे. पावसाळ्यात हा विषाणू मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहे. याचा प्रसार दूषित अन्न, पाणी, लाळ आणि विष्ठेतून होतो. हा विषाणू मुख्यतः श्वानांच्या पिल्लांमध्ये प्रसारित होतो. घरातील श्वानांना विषाणूची लागण झाली असता, त्याला घरातील लहान मुले किंवा इतर दुसऱ्या श्वानांमध्ये ठेऊ नये, असे आवाहन पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

या आजाराची लक्षणे :
रक्त मिश्रित अतिसार, अशक्तपणा, अन्न-पाणी न पचणे, वारंवार उलटी आणि दस्त

प्रतिबंधक उपाय :
लस न दिलेले श्वान या आजाराने लगेच ग्रस्त होतात. त्यामुळे वेळोवेळी लसीकरण करणे खूप महत्त्वाचे आहे. अशा श्वानांना भटक्या श्वानांमध्ये जाऊ देऊ नये किंवा बाहेर फिरवताना त्यांनी काही खाऊ नये याची काळजी घ्यावी .

या विषाणूंची लागण झालेल्या श्वानांना राहण्यासाठी वेगळी जागा करावी. ती दिवसभरात दोन ते तीने वेळा निर्जंतुक करायला हवी. त्यांचे पाणी पिण्याचे भांडे वेगळे ठेवायला हवे. त्यामधील पाणी किमान तीन ते चार वेळा बदलावे. त्याच्या राहण्याच्या जागेवर इतर श्वानांना किंवा बालकांना येऊ देऊ नये. रक्तमिश्रित अतिसारामुळे संसर्ग झालेल्या श्वानांना अन्न-पाणी पचत नाही. त्यासाठी पाण्यात इलेक्ट्रॉल पावडर मिक्स करून घ्यावी. श्वानाची स्वच्छता झाल्यानंतर प्रथम स्वत:चे हात आणि पाय स्वच्छ धुवून, सॅनिटाइज करावे.
-अभिजित पाटील, श्वान प्रशिक्षक आणि मानसशास्त्र अभ्यासक, निगडी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84745 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..